रेशन दुकानात वितरणासाठी आलेला माल पिलीव येथील रासायनिक खताच्या गोडावूनमध्ये ठेवण्यात आला. डिसेंबरमधील मालाबाबत विचारणा केली असता संपल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यापूर्वीच्या काळातही वाटपात अनियमितता झाली असून, संबंधित दुकानदारावर कारवाई करावी, अशा आशयाची तक्रार सुळेवाडीचे ग्रामस्थ विक्रम सुळे यांनी महसूल विभागाकडे केली आहे. यापूर्वीही शिवाजी सुळे व बाजीराव सुळे यांनी याबाबतच्या तक्रारी जिल्हा व आयुक्तांकडे केलेल्या आहेत.
कोट :::::::::::::::::
दुकानाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने डिसेंबरमधील माल पिलीव येथील गोडावूनला ठेवला होता. त्यानंतर वितरण करताना वाटप मशीन फक्त तीन चालल्या. त्यानंतर त्या बंद राहिल्या. त्यामुळे मालाचा शिल्लक स्टॉक मशीन व रेकॉर्डला शिल्लक आहे.
- कबीर माने
रेशन दुकान चालक, सुळेवाडी
फोटो :::::::::::::::::::::::::
रेशन दुकानासमोर माल घेण्यासाठी झालेली ग्रामस्थांची गर्दी.