परिचारिका दिनाचे औचित्य साधून येथील सामाजिक कार्यकर्ते बालाजी माने यांनी या सत्काराचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प. पू. गोरक्षनाथ महाराज होते. यावेळी आरोग्य अधिकारी मयूरी भालकरे, आरोग्यसेविका मैनावती पाटील, आशा वर्कर सुवर्णा काजळे, शांताबाई पवार, भाग्यश्री वर्दे, परिचर गजाबाई पवार, अंगणवाडी सेविका निर्मला धुमाळ, कमल थोरे, वर्षा चव्हाण, सारिका चव्हाण, अनिता साळुंके, लक्ष्मी माने यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस पाटील संतोष पाटील, परमेश्वर चव्हाण, बालाजी माने, सुनील माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
------
लसीकरणाचा विक्रम
तालुक्यात लसीकरणाचा विक्रम
चुंगी येथे ४५ वर्षांवरील ९०० नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. समुदाय आरोग्य अधिकारी मयूरी भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवीत आतापर्यंत ७५० जणांना लस देण्यात आली. लक्ष्यांकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत तालुक्यात उचांक गाठला आहे.
----