व्यक्तिमत्त्व विकासात संभाषण कौशल्य महत्त्वाचे : सूर्यवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:48 AM2021-02-05T06:48:41+5:302021-02-05T06:48:41+5:30
रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात नॅशनल स्कील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क योजनेंतर्गत एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे ...
रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात नॅशनल स्कील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क योजनेंतर्गत एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे होते.
यावेळी डॉ. सूर्यवंशी यांनी इंग्रजी भाषा अवगत करण्यासाठी इंग्रजी बातम्या व चित्रपट पाहणे आवश्यक आहे, इंग्रजी संभाषणासाठी योग्य जोडीदार निवडून त्याच्याशी संवाद केला पाहिजे, असे सांगितले.
प्रास्ताविक प्रा. डॉ. समाधान माने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. रणजित चौगुले यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण शिंदे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. निंबराज तंटक, उपप्राचार्य डॉ. लतिका बागल, उपप्राचार्य चंद्रकांत रासकर, अधिष्ठाता प्रोफेसर डॉ. तानाजी लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुखदेव शिंदे, रुसा समन्वयक डॉ. बजरंग शितोळे, स्वायत्त समन्वयक डॉ. मधुकर जडल, डॉ. अमर कांबळे, अनंता जाधव, प्रा. तेजस चौगुले, प्रा. अश्विनी जाधव, प्रा. परमेश्वर दुधाळ, प्रा. धनंजय वाघदरे, प्रा. सुहास शिंदे आदी उपस्थित होते.