बापूजी नगरातील वृद्धाचा 'कोरोना'ने मृत्यू; नव्याने आढळले तीन रुग्ण:
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 08:44 PM2020-04-28T20:44:46+5:302020-04-28T20:46:45+5:30
धक्कादायक; झोपडपट्टी, सोसायटीनंतर 'कोरोना' घुसला आता पालात
सोलापूर : शहरात 'कोरोना' पॉझिटिव्हची संख्या वाढत चालली असून, आता तर झोपडपट्टी, सोसायटीनंतर पालामध्ये राहणाºयांनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी रेल्वे स्टेशन, बापूजी नगर आणि सिद्धेश्वर पेठेत राहणाºया तिघांना 'कोरोना'ची लागण झाल्याचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सांगितले, तर बापूजीनगरातील एका वृद्धाचा मृत्यू झाला. अशाप्रकारे जिल्ह्यातील कोरणा रुग्णांची संख्या एकूण ६८ तर मृत्यूची संख्या ६ इतकी झाली आहे.
बापूजी नगरात 'कोरोनाा' पॉझीटीव्ह रुग्ण यापूर्वीच आढळले आहेत. त्यात बापूजी नगरातील ७६ वर्षीय वृद्धास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे सोलापुरात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या सहा इतकी झाली आहे. त्याचबरोबर मंगळवारी पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये एक महिला व दोन पुरूष आहेत. यामधील महिला रेल्वे स्टेशन परिसरातील शनि मंदिराजवळ पालात राहणारी आहे. या महिलेचे कुटुंब मंदिराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पाल टाकून गुजराण करीत होते. ही महिला स्टेशन परिसरात फिरताना आढळली. तिला सर्दी व खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वॅब तपासणीत तिचा अहवाल सारी पॉझीटीव्ह आला आहे. आता नातेवाईकांचा शोध घेतला कोणीच मिळून आले नाहीत म्हणून याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आली आहे.
बापूजीनगरात राहणारा युवक हा कोरोनाने मरण पावलेल्या वृद्धाच्या संपर्कात आला होता. त्यामुळे क्वारंटाईन करण्यात आले होते. स्वॅब तपासणीत त्याचाही अहवाल आता पॉझीटीव्ह आला आहे. दुसरा युवक सिद्धेश्वर पेठेतील आहे. त्यालाही सारीची लागण झाली आहे. त्याचा संपर्क कोणाशी आला याची माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत त्याची हिस्ट्र तपासण्यात येत आहे. मंगळवारी ५८ अहवाल आले. त्यात ५५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आहेत.