कोरोना रुग्णांनी हॉस्पिटल पुन्हा होताहेत हाऊसफुल्ल; ठराविक रुग्णालयात रुग्ण वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 01:05 PM2021-03-17T13:05:54+5:302021-03-17T13:06:00+5:30

सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी पुन्हा वाढली

Corona patients are re-hospitalized housefull; On patient waiting in a typical hospital | कोरोना रुग्णांनी हॉस्पिटल पुन्हा होताहेत हाऊसफुल्ल; ठराविक रुग्णालयात रुग्ण वेटिंगवर

कोरोना रुग्णांनी हॉस्पिटल पुन्हा होताहेत हाऊसफुल्ल; ठराविक रुग्णालयात रुग्ण वेटिंगवर

Next

सोलापूर: जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी पुन्हा वाढली आहे. मार्च महिन्यात कोरोना पॉझीटीव्हचे रुग्ण दररोज वाढू लागल्याने ठराविक हॉस्पिटलमधील खाट हाऊसफुल्ल झाल्याने रुग्णांना वेटिंगवर रहावे लागत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार १६ मार्च रोजी जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर हॉस्पीटल व कोव्हीड सेंटरमध्ये १ हजार ६८८ रुग्ण उपचार घेत असल्याचे नमूद केले आहे. यामध्ये सोलापूर महापालिका हद्दीतील ७२५ व ग्रामीण आणि नगरपंचायत क्षेत्रातील ९६३ रुग्ण आहेत. या सिव्हील हॉस्पिटलमध्ये नॉर्मल ४४ तर क्रिटीकल ७ रुग्ण ॲडमिट आहेत. त्याचबरोबर यशोधरामध्ये ३३ व क्रिटीकल १३, अश्विनीमध्ये ७५ व क्रिटीकल ३७, मार्कंडेयला ४६ व क्रिटीकल २३, सीएनएसला १५ व क्रिटीकल ८ असे रुग्ण ॲडमिड आहेत. शहरातील ११ रुग्णालयात २२३ नॉर्मल व ८९ जोखमीचे रुग्ण ॲडमिट आहेत. त्याचबरोबर मोनार्चमध्ये १०, रेल्वे हॉस्पिटलमध्ये ३, विमा: ०, नवनीतमध्ये २८ व जोखमीचे २७, बॅाईसमध्ये ४४ व जोखमीचे ३ रुग्ण ॲडमिट आहेत. काही महत्वाच्या रुग्णालयांमध्ये खाट मिळविण्यासाठी रुग्णांना वेटिंगवर रहावे लागत असल्याचे चित्र आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता उपलब्ध खाटांची रुग्णांना माहिती मिळण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा राबवावी अशी मागणी होत आहे.

ग्रामीणमध्ये ५१६ रुग्ण

ग्रामीण भागात १२ रुग्णालयात ३५९ नॉर्मल तर १५७ अतिजोखमीचे रुग्ण उपचारास दाखल आहेत. यामध्ये बार्शीच्या जगदाळे मामा हॉस्पीटलमध्ये १९ व जोखमीचे २, सश्रुतमध्ये ३१ व जोखमीचे १२, पंढरपूरच्या गॅलेक्सीमध्ये २३ व जोखमीचे १२, लाईफलाईनमध्ये १३ व जोखमीचे १३, अकलुजच्या क्रीटीकेअरमध्ये १४ व जोखमीचे १०, अश्विनीमध्ये १५ व जोखमीचे १२ रुग्ण उपचारास दाखल आहेत. त्याचबरोबर सोमाणीमध्ये २२ व जोखमीचे २, पंढरपूर जिल्हा रुग्णालयात १७ व जोखमीचे ४, अकलुजच्या सोमाणीमध्ये १३ व जोखमीचे २, आयसीयुमध्ये १० व जोखमीचे ८ रुग्ण दाखल आहेत.

जोखमीचे २१० रुग्ण

सध्या ॲडमिट असलेल्या एकूण रुग्णांपैकी जोखमीचे २१० रुग्ण उपचार घेत आहेत. पॉझीटीव्ह असलेले १ हजार १६८ रुग्ण आहेत, सौम्य लक्षणे असलेले ३१० तर क्रिटीकल स्थितीचे २१० रुग्ण आहेत. मार्च महिन्यात रुग्ण दुप्पट झाले आहे व दररोज ही संख्या वाढत असल्याचे चिंता वाढली आहे. शहर हद्दीत पॉझीटीव्ह आलेले ४२ जण शासकीय तंत्रनिकेतन,वाडीयामध्ये ११५ व होय आयसोलेशनमध्ये २५६ जण आहेत. ग्रामीणमध्ये ११ कोवीड केअरमध्ये ५८८ जण दाखल आहेत तर ८४४ जण होम आयसेलोशनमध्ये आहेत.

 

Web Title: Corona patients are re-hospitalized housefull; On patient waiting in a typical hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.