शंभूराजे जगताप यांना रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जातेगाव येथील एका व्यक्तीचा फोन आला. ते म्हणाले ‘गावात एक महिला आजारी आहे. त्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांना रुग्णालयात न्यायचे आहे. त्यांचे नातेवाईक नाहीत. १०८ रुग्णवाहिकेला कॉल केला मात्र येत नाही. आपण एकदा कॉल केला तर बरं होईल’ त्यावर शंभूराजे यांनी स्वतः रुग्णवाहिकेसाठी कॉल केला मात्र रुग्णवाहिका येत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्वतः सहकाऱ्यांना घेऊन जातेगाव गाठले व कसलीही मनात भीती न बाळगता त्या बाधित रुग्णाला उपजिल्हा रुग्णालयात स्वत:च्या गाडीत घेऊन आले.
----
जातेगावच्या उपसरपंचांचा फोन आला त्यांनी गावातील एक महिला आजारी असल्याचे सांगितले. मात्र, १०८ रुग्णवाहिका पॉझिटिव्ह रुग्णाला नेण्यासाठी घरी येत नाही म्हणून मी स्वतःच सहकाऱ्यांना घेऊन संबंधित रुग्णाच्या घरी गेलो आणि त्यांना गाडीत घेऊन आलो. त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
- शंभूराजे जगताप,
---
फोटो २४करमाळा जगताप
ओळी : कोरोनाबाधित आजीला स्वत: उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना शंभूराजे जगताप.