CoronaVirus News : हॉस्पिटलच्या भीतीने उशिरा दाखल, सरकारी रुग्णालयात परवड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 01:45 AM2020-06-23T01:45:21+5:302020-06-23T01:45:39+5:30

CoronaVirus News : कोरोनासोबतच सारीचे रुग्ण वाढ होत असल्याने मृत्यूमध्ये वाढ होते आहे.

CoronaVirus News : Late admission due to fear of hospital, affordable in government hospital | CoronaVirus News : हॉस्पिटलच्या भीतीने उशिरा दाखल, सरकारी रुग्णालयात परवड

CoronaVirus News : हॉस्पिटलच्या भीतीने उशिरा दाखल, सरकारी रुग्णालयात परवड

Next

समीर इनामदार 
सोलापूर: शासकीय रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांचा अभाव आणि होणारी परवड पाहता रुग्णालयात जाण्यापेक्षा आजार घरीच अंगावर काढण्याची मानसिकता वाढल्याने सोलापुरात मृत्यूची संख्या वाढली. कोरोनासोबतच सारीचे रुग्ण वाढ होत असल्याने मृत्यूमध्ये वाढ होते आहे.
सोलापुरात रविवारपर्यंत २१२६ इतके रुग्ण होते आणि मृतांची संख्या १८१ इतकी आहे. सोलापूरचा मृत्यू दर ८.५१ इतका आहे. १२ एप्रिल रोजी पहिला रुग्ण सापडला. त्याचे निदानही मृत्यूनंतर झाले. सोलापूरचे अधिकाधिक रुग्ण हे पॉझिटिव्ह असल्याचे त्यांच्या मृत्यूनंतर कळाले आहे. मृत्यूमुखी पडलेल्या अधिकांश रुग्णांची हिस्ट्री तपासल्यानंतर एकतर ते झोपडपट्टी परिसरातील किंवा ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता अधिक आहे, अशा परिसरातील आहेत. ५० पेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांचे मृत्यू अधिक प्रमाणात झाले आहेत. यात अनेक श्रमिक मजुरांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या अनुसार अनेक कामगारांना असणारे फुफ्फुसाचे आजार, व्यसने आणि प्रदूषण ही देखील मृत्यूची कारणे आहेत.
पॉझिटिव्ह आल्यानंतर शासकीय रुग्णालयात होत असलेली परवड, खासगी रुग्णालयांचे न भरतायेण्याजोगे बिल यामुळे दवाखान्यात जाण्यापेक्षा घरी मरण परवडले अशी स्थिती रुग्णांची झाली आहे. सारी म्हणून दाखल झालेल्या रुग्णांचा मृत्यूनंतर कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. माजी आमदार युन्नूसभाई शेख, अ‍ॅड. नेर्लेकर यांच्याबाबतीत हे म्हणता येईल. त्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा संसर्ग होतो की काय अशीही भीती अनेकांना आहे.
>जिल्ह्यात सोमवारी नव्याने आठ जण पॉझिटिव्ह
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या करमाळा तालुक्यानेही सोमवारी खाते उघडले आहे. तालुक्यातील झरे येथे एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात सोमवारी नव्याने आठ रुग्ण दिसून आल्याने रुग्णसंख्या २०४ इतकी झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ७ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बोरगाव, सलगर, मैंदर्गी, करजगी येथील समावेश आहे.
सोमवारी करमाळा तालुक्यातील झरे येथे एक रुग्ण आढळलो. यामुळे जिल्हा आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले असून, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा उपयशी ठरत आहे.
जिल्ह्यात सोमवारी १०७ रुग्णांचा अहवाल आला त्यात ८८ निगेटीव्ह तर आठ पुरूष रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. अशाप्रकारे १९६ रुग्णांची नोंद झाली होती, त्यात सोमवारी ८ रुग्णांची भर पडली आहे. अशाप्रकारे २०४ रुग्णसंख्या झाली असून, त्यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज आढळलेले रुग्ण- अक्कलकोट, बुधवारपेठ:१. उल्हासनगर:२, बोरगाव:१, सलगर:१, करजगी:१, मैंदर्गी:१, करमाळा, झरे:१.

Web Title: CoronaVirus News : Late admission due to fear of hospital, affordable in government hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.