ग्रामपंचायतींसाठी सहा टप्प्यांत होणार मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:20 AM2021-01-18T04:20:22+5:302021-01-18T04:20:22+5:30

अक्कलकोट : तालुक्यात ६२ ग्रामपंचायतींसाठी सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली. आता ग्रामस्थांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. प्रशासनानेदेखील मतमोजणीची तयारी ...

Counting of votes for Gram Panchayats will be done in six phases | ग्रामपंचायतींसाठी सहा टप्प्यांत होणार मतमोजणी

ग्रामपंचायतींसाठी सहा टप्प्यांत होणार मतमोजणी

Next

अक्कलकोट : तालुक्यात ६२ ग्रामपंचायतींसाठी सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली. आता ग्रामस्थांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. प्रशासनानेदेखील मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. एकूण सहा टप्प्यांत निकालाच्या फेऱ्या पूर्ण होणार असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली.

१८ जानेवारी रोजी नवीन तहसील कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे. सर्वच ग्रामपंचायतींची मतमोजणी एकाच वेळी होणार नसून, त्यांना ठरावीक वेळ देण्यात आली आहे. त्या ठरावीक वेळेमध्ये त्या-त्या ग्रामपंचायतीची मतमोजणी होईल. यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. आज, सोमवारी सकाळी ८.३० ते ११ दरम्यान सहा टप्प्यांत याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात सकाळी ८.३० वाजता गुड्डेवाडी, नागूर, तोरणी, गोगांव, मोट्याळ, शेगाव, साफळे, बर्‍हाणपूर, बोरोटी खु, निमगांव, आंदेवाडी खु, संगोगी (अ), सिंदखेड, बॅगेहळ्ळी, गळोरगी, तर सकाळी नऊ वाजता देविकवठे, इब्राहिमपूर, डोंबरजवळगे, बोरोटी बु, बासलेगाव, चिंचोळी न. बादोले बु, हालहळ्ळी (अ), कर्जाळ, हिळ्ळी, भोसगे, खैराट, चपळगावची मतमोजणी होणार आहे. सकाळी ९.३० वाजता - आळगे, बबलाद, भुरीकवठे, चपळगाववाडी आणि सकाळी १० वाजता - गौडगांव खु, काझीकणबस, दोड्याळ, कल्लहिप्परगे, मुंढेवाडी, गुरववाडी, जेऊर, मराठवाडी, किणीवाडी, कोर्सेगाव, सिन्नूर, सांगवी खु, चिक्केहळ्ळी, पितापूर, किरनळ्ळीची मतमोजणी होणार आहे. १०.३० वाजता - मिरजगी, चुंगी, गौडगांव बु, तडवळ, हैद्रा, नागणसूर, किणी, सुलेरजवहगे, चिंचोळी (मै), सांगवी बु, हन्नूर, वागदरी आणि सकाळी ११ वाजता - उमरगे, कुरनूर, मुगळी अशा प्रकारे सहा टप्प्यांत मतमोजणी होत आहे. दुपारी १ वाजेर्पंत सर्व ग्रामपंचायतीचे निकाल अधिकृतपणे जाहीर होतील असे सांगितले जात आहे. ज्या वेळेला ज्या गावची मतमोजणी आहे त्याचवेळी मतमोजणीच्या ठिकाणी संबंधित उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना आत सोडले जाणार आहे. तहसील कार्यालयाच्या आवारात गर्दी करू नये, असे आवाहन तहसील प्रशासनाने केेले आहे.

Web Title: Counting of votes for Gram Panchayats will be done in six phases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.