अकलूजमध्ये कोव्हिशिल्ड लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:20 AM2021-01-18T04:20:04+5:302021-01-18T04:20:04+5:30
नुकतेच ‘कोव्हिड लस ड्राय रन’ची रंगीत तालीम यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणासाठी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी सायंकाळी ६.३० ...
नुकतेच ‘कोव्हिड लस ड्राय रन’ची रंगीत तालीम यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणासाठी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता जिल्हास्तरावरून १७९० कोव्हिड शिल्ड लस घेऊन पोहोचलेल्या पथकाचे स्वागत केले. देशभरात निश्चित केलेल्या केंद्रांवर शनिवारी सकाळी लसीकरण मोहिमेला प्रांताधिकारी शमा पवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. पहिली लस डाॅ. मनीषा कदम यांना देण्यात आली.
यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. प्रदीप ढेले, डाॅ. एम. के. इनामदार, माता बाल संगोपन अधिकारी डाॅ. अनिरूध्द पिंपळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. रामचंद्र मोहिते, आयएमए अकलूजचे अध्यक्ष डाॅ. नितीन एकतपुरे, डाॅ. सुप्रिया खडतरे, डाॅ. दिलीप सिध्दपुरा, डाॅ. संतोष खडतरे, डाॅ. श्रेणिक शहा, डाॅ. अनिकेत इनामदार, डाॅ. निनाद फडे, डाॅ. संकल्प जाधव, डाॅ. सुरेश सूर्यवंशी उपस्थित होते.
कोट :::::::::::::::::
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात चार दिवसांचे नियोजन केले आहे. माळशिरस तालुक्यातील सरकारी व खासगी डाॅक्टरांसह आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स अशा १६०० जणांना लस देण्यात येत आहे.
- डॉ. रामचंद्र मोहिते
तालुका वैद्यकीय अधिकारी