बार्शी : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करता युवा प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षी कोणाकडेही वर्गणी न मागता शिवजन्मोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. सुशांत चव्हाण यांनी मंगळवारी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात व्यापार ठप्प होता. सर्वच घटकांवर त्याचा परिणाम झाला आहे. सध्या सर्वत्र परिस्थिती पूर्वपदावर आली असली तरी बहुतांश लोकांना याचा आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. मागील अनेक वर्षांपासून यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी आयोजित केलेले शिवभोजन, किल्ले प्रतिकृती देखावा, स्टेज देखावा, आदी कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे खजिनदार सदानंद गरड यांनी दिली. या बैठकीत नूतन पदाधिकारी निवडण्यात आले.
मंडळाची २०२१ ची कार्यकारणी : अध्यक्ष अभिजित हांडे, उपाध्यक्ष मोहित मस्तूद, खजिनदार शंकर चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.