मोठी बातमी; कोरोनाने मृत पावलेल्या पालकांच्या पाल्याची शैक्षणिक अन् परीक्षा फी माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 07:25 PM2021-06-28T19:25:12+5:302021-06-28T19:25:53+5:30

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांच्यासोबत झाली बैठक

Decision of Solapur University; Corona waives the educational and examination fees of the parents of the deceased parents | मोठी बातमी; कोरोनाने मृत पावलेल्या पालकांच्या पाल्याची शैक्षणिक अन् परीक्षा फी माफ

मोठी बातमी; कोरोनाने मृत पावलेल्या पालकांच्या पाल्याची शैक्षणिक अन् परीक्षा फी माफ

Next

सोलापूर - कोरोना आजाराने मरण पावलेल्या आई-वडिलांच्या पाल्यास महाविद्यालयीन व विद्यापीठाची शैक्षणिक फी आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय झाल्याची माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

सोमवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांच्यासोबत राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू यांच्यासोबत ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले. सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठ संकुलात शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या बैठकीमध्ये राज्यातील विविध भागांतील कोरोना परिस्थिती आणि शैक्षणिक वातावरण याचा शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा घेतला. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली. ही बैठक अत्यंत सकारात्मक झऱ्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सर्वप्रथम 20 टक्के परीक्षा शुल्क माफ; यंदाही विद्यार्थी हिताचा निर्णय
राज्यात सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कोरोना महामारीमुळे मागील वर्षाची 20 टक्के परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत केली आहे.  यंदाच्या वर्षी देखील शासनाच्या मार्गदर्शक सूचना व निर्णयाप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून फीबाबत विद्यार्थी हिताचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी बैठकीत सांगितले. सोलापूर विद्यापीठाच्या या निर्णयाचा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी कौतुक केले.

Web Title: Decision of Solapur University; Corona waives the educational and examination fees of the parents of the deceased parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.