कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवा : संभाजी शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:23 AM2021-07-30T04:23:26+5:302021-07-30T04:23:26+5:30
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून, जिल्हा संपर्क प्रमुख आ. तानाजी सावंत, जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत ...
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून, जिल्हा संपर्क प्रमुख आ. तानाजी सावंत, जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर विभागात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत भोसे कार्यक्रम कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. शिवसैनिकांची सदस्य नोंदणी करणे, विविध गावात नवीन शाखा स्थापन करणे, महिला आघाडी, युवा सेना यांच्या शाखा वाढविणे, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता मतदारांची नोंदणी करणे आदी उपक्रम याअंतर्गत राबिवण्यात येणार आहेत, असे संभाजी शिंदे यांनी सांगितले.
यावेळी तालुका प्रमुख महावीर देशमुख, भगवान जमदाडे, विभाग प्रमुख प्रशांत जाधव, गटप्रमुख शुभम चव्हाण, शाखा प्रमुख विलास कोरके, सुहास तळेकर, महेश सुरवसे, नागनाथ सुरवसे, उमेश घोडके, पांडुरंग सावंत, कुमार शेळके, नागनाथ माळी आदी उपस्थित होते.