लिंगायत समाजाच्या जागेतील अतिक्रमण हटवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:33 AM2021-02-23T04:33:31+5:302021-02-23T04:33:31+5:30
करमाळा : शहराच्या मध्यभागी एस.टी.बसस्थानकाशेजारी असलेल्या लिंगायत समाजाच्या मानूरकर मठाच्या जागेत अतिक्रमण झाले आहे. गुरु विरुपाक्ष शिवाचार्य मानूर संस्थान ...
करमाळा : शहराच्या मध्यभागी एस.टी.बसस्थानकाशेजारी असलेल्या लिंगायत समाजाच्या मानूरकर मठाच्या जागेत अतिक्रमण झाले आहे. गुरु विरुपाक्ष शिवाचार्य मानूर संस्थान मठाच्या जागेतील अतिक्रमण जमीनदोस्त करून अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी मठाधीश गुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी करमाळा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.
करमाळा एसटी स्टँडच्या बाजूला लिंगायत धर्मपीठाची १२ एकर जमीन आहे. या जमिनीला सध्या मोठा दर असून ३० लाख रुपये गुंठा दराने ती जागा समाजाच्या शैक्षणिक कारणासाठी वापरण्यास मठाने परवानगी दिली आहे; मात्र लोकांनी या जागेवर पक्क्या स्वरूपाची घरे व दुकाने बांधण्यास सुरुवात केली आहे.
नगरपालिका प्रशासन व तहसील प्रशासन या अतिक्रमण करणाऱ्या लोकांना पाठीशी घालत आहे. संबंधित व्यक्ती वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही.प्रशासनाने अतिक्रमणित मालकांना नोटिसा काढून कारवाई करावी अशी मागणी केली आहे
मानूर मठाचे भक्तगण सोमनाथ चिवटे, सूर्यकांत चिवटे, संजय शीलवंत, गणेश चिवटे, महेश चिवटे, शेखर स्वामी, सचिन साखरे, शंकरराव पाटणे, चंद्रशेखर शीलवंत, चंद्रशेखर राजमाने, गणेश ममदापूर, सतीश शहापुरे, गजेंद्र गुरव, मनोज पाटणे, प्रशांत ठेंगडे, नितीन घोडेगावकर, नंदू कोरपे, किरण कोरपे, संदेश विभुते, सुनील विभूते, बाबासाहेब बरिदे, रवींद्र बरिदे, अभय महाजन, बाळासाहेब महाजन, संजय महाजन, योगेश सुरवडे, अमोल कोरे, संकेत पुरानिक, चंद्रकांत स्वामी, शिवानंद स्वामी, किरण स्वामी, शिवकुमार चिवटे, देविदास चिवटे ,अविनाश चिवटे ,सचिन माहुले, वसंत न्हावकर, राजेंद्र माऊली, सुभाष लिंगडे यांनी पाठिंबा दिला आहे. या मागणीबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.