कमलापूर ते आजनाळे जाणारा ७ किमीचा रस्ता चाऱ्या, खड्डे व ठिकाणी उखडल्याने खराब झाला होता. दुचाकीस्वार, चारचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. यामुळे अजनाळे येथील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर २०१८ मध्ये कोट्यावधी रूपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाईपलाईन नेण्यासाठी कोणतीही परवानगी न घेता जेसीबीच्या सहाय्याने ठिकाणी चाऱ्या खोदल्या आहेत. यामुळे रात्री-अपरात्री चाऱ्या व खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना कसरत करूनच वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे अजनाळे ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी सदर रस्त्यावरील खड्डे व चाऱ्या बुजवून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
कोट ::::::::::::::::
अजनाळे-कमलापूर खराब रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु लाॅकडाऊनमुळे या रस्त्याचे काम प्रलंबित राहिले. रस्त्याची पाहणी करून विनापरवाना चाऱ्या खोदलेल्या शेतकऱ्यांना नोटीस काढून हा रस्ता ८ ते १० दिवसात दुरुस्त केला जाईल.
- अशोक मुलगीर
उपविभागीय अभियंता
फोटो ओळ ::::::::::::::
अजनाळे-कमलापूर रस्त्यावर शेतकऱ्यांनी पाईपलाईन नेण्यासाठी खोदलेल्या चाऱ्यांचे छायाचित्र.