करमाळा : तालुक्यात केळी संशोधन केंद्राची उपशाखा स्थापन केली जावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे केली आहे.
तालुक्यात केळीचे क्षेत्र हे चार हजार हेक्टर इतके आहे. त्यामुळे केळी प्रकारात वाढ होण्यासाठी तसेच नवीन रोग नियंत्रणासाठी औषध निर्माण होणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून संशोधन होणे गरजेचे आहे. त्याकरिता केळी संशोधनाची उपशाखा करमाळा तालुक्यात व्हावी. यामुळे तालुक्यातील केळी निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रगत होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी गजानन भाकरे, अण्णा गायकवाड, कंदर येथील केळी व्यापारी किरण ढोके उपस्थित होते.
===
फोटो : २९ करमाळा केळी
केळी संशोधन केंद्र करमाळ्यात सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देताना भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे.