सोलापूर: जिल्हा परिषदेतील प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांची उस्मानाबादला बदली झाली असून, त्यांच्याजागी ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाने राज्यातील उप मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये जिल्हा परिषदेतील परमेश्वर राऊत उस्मानाबादला त्याच पदावर बदली झाली आहे. ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची राऊत यांच्या रिक्तजागी नियुक्ती झाली आहे. तर पाटील यांच्याजागी नाशिक जिल्हा परिषदेतील जलजीवन मिशनच्या संचालक इशाधीन शेळकंदे यांची नियुक्ती झाली आहे.
शेळकंदे यांनी यापूर्वी पंढरपूरचे गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे. राऊत यांनी चार वर्षात प्रशासन विभागात चांगली कामगिरी केली. पदोन्नती, अंनुकंपा भरती, त्याचबरोबर सर्वसाधारण सभेचे सचिव, ग्रामपंचायत, आरोग्य विभागातील कार्यक्रमांचे चांगले नियोजन केले.