सोलापूर : शिंदे-फडणवीसांचे सरकार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद, कार्यक्रमातील किस्से आपण पाहिले अन् वाचले असतील. असाच एक किस्सा सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या गुरव समाजाच्या महाअधिवेशनात घडला तो चर्चा ... चिठ्ठी अन् घोषणेचा.
सोलापुरात रविवारी गुरव समाजाचे महाअधिवेशन होते. नागपूर येथील कार्यक्रम उरकून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही सोलापुरात येणार होते. तसा दौराही आला होता. ठरल्याप्रमाणे दोघांचेच सुमारास सोलापुरातील शासकीय विश्रागृहावर आगमन झालं अन् त्यांचा ताफा व्हीआयपी रोडवरून सुसाट निघाला. विश्रामगृहाकडे जाणारा ताफा अचानक विजापूर रोडकडे वळला अन् तो महाअधिवेशनाच्या कार्यक्रमस्थळी दाखल झाला.
प्रोटोकॉलप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांचं प्रथम भाषण झालं अन् शेवटी अध्यक्षीय भाषण करण्यासाठी मुख्यमंत्री उठले. तेव्हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात काही मिनिटं चर्चा झाली. त्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना उपमुख्यमंत्र्यांनी एक चिठ्ठी लिहिली अन् ती पीएच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविली अन् मुख्यमंत्र्यांनी संत काशीबा युवा विकास घोषणा करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्या योजनेचा स्वागत करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.