पंढरपूर : स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर या घोष वाक्यासह पंढरपूर शहर डिजीटलमुक्त करण्याचा निर्धार नगरपरिषदेने केला होता. परंतु मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वागताचे डिजीटल रस्त्यावर सर्वत्र लागले आहेत. यामुळे डिजीटल मुक्त पंढरीत पुन्हा डिजीटल झळकू लागले आहेत.
पंढरपूर नगरपरिषदेमध्ये राजकीय पक्षांचे डिजीटल लावण्यावरुन वाद झाले आहेत. तसेच पंढरपुरातील प्रत्येक चौकात डिजीटल लावण्यात येत होते. तसेच डिजीटलवरील महापुरुषांचा फोटोची विटंबना होण्याची शक्यता असते. यामुले कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे राजकीय डिजीटल फलक लावण्यास नगरपरिषदेने बंदी केली आहे. फक्त व्यवसायिक डिजीटल फलक लावण्यास परवानगी देण्याबाबत नगरपरिषदेकडून मंजुरी मिळते. कोणी राजकीय डिजीटल लावले, तर काढण्यासाठी एक पथक नगरपरिषदेने नेमले होते.
सध्या शहरातील अनेक रस्त्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वागताचे डिजीटल शिवसेनेच्या काही नेत्यांनी लावल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रमुख स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात राजकीय डिजीटल लावण्यात आले आहे. यामुळे पंढरपूर नगरपरिषदेकडून हे डिजीटल फलक काढण्यात येणार का असा सवाल नागरीकातून विचारण्यात येत आहे.
-----------------
नगरअभियंता, अतिक्रमण विभागाशी चर्चा डिजीटल चर्चा करुन पुढील कारवाई करण्यात येईल.
- सुनिल वाळुजकर,
उपमुख्याधिकारी पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर