करमाळा : चिखलठाण (ता. करमाळा) येथे काल शनिवारी रात्री उशिरा चुलत भावाने -भावाचा खून केल्याची घटना घडली आहे.
मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद होता. तर काल सायंकाळी मासेमारीवरुन हा वाद शिगेला पोहोचला. यावेळी झालेल्या वादातून चुलत भावांनी मिळुन अजित गलांडे व मिथुन गलांडेला काठीने मारहाण केली, यामध्ये अजित चा मृत्यू झाला आहे. तर मिथुन गंभीर जखमी झाला आहे.
शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अजित व मिथुन हे भीमा नदी काठी मासेमारीसाठी गेले होते. त्याठिकाणी संशयित उमेश राजाराम गलांडे, संतोष राजाराम गलांडे, राजाराम बलभिम गलांडे (सर्व रा. चिखलठाण) हे सर्व तिथे आले. त्यांनी मासेमारीच्या जागेवरुन वाद करुन दोघांना काठीने मारण्यास सुरुवात केली व त्यात अजितचा जागीच मृत्यू झाला तर मिथुन गंभीर जखमी झाला आहे अशी फिर्याद मयताच्या वडिलांनी दिली आहे. पोलिसात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.