अपात्र सदस्यांनी निवडला नातेवाइकांचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:12 AM2020-12-28T04:12:48+5:302020-12-28T04:12:48+5:30
अपात्र ठरलेल्या सदस्यांपैकी काहीजण गावागावांचे महत्त्वाचे गावपुढारी आहेत. त्यामुळे त्यांना या ग्रामपंचायतच्या निवडणुकीतून बाहेरच रहावे लागणार आहे. त्यामुळे ते ...
अपात्र ठरलेल्या सदस्यांपैकी काहीजण गावागावांचे महत्त्वाचे गावपुढारी आहेत. त्यामुळे त्यांना या ग्रामपंचायतच्या निवडणुकीतून बाहेरच रहावे लागणार आहे. त्यामुळे ते आपल्या हक्काच्या जागेवर जवळच्या व्यक्तीला उभा करण्यासाठी शोध घेत आहेत. एकंदरीतच तालुक्यातील त्या अपात्र उमेदवारांंना यंदा निवडणूक लढविता येणार नाही. जरी फॉर्म भरले तरी ते छाननीत बाद केले जातील, असे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी सांगितले आहे.
गावनिहाय अपात्र सदस्य
शिंदेवाडी २,लऊळ ३५,चव्हाणवाडी ६,बावी २१, मिटकलवाडी ७, शिराळ (मा) ५,उपळाई (बु) ९,टाकळी (टे) ७, वडाचीवाडी (उ.बु) ८,लव्हे २,नगोर्ली १८, ढवळस १०, अकुलगाव ८, धानोरे २०, भोगेवाडी १४, जाधववाडी (मा) ५, मोडनिंब ७, जामगाव १०, आकुंभे १, वडाचीवाडी (अ.उ) ७, बुद्रुकवाडी ६, कुंभेज ४, फुटजवळगाव ७, लोंढेवाडी ३, तांदूळवाडी ७, सुर्ली ५, शिराळ (टे) १४, बैरागवाडी १, शेवरे १०, माळेगाव ९, बारलोनी ६, रुई ३, आलेगाव(बु) ७, महादेववाडी ३, महातपूर १, चिंचगाव २२, पापनस ६, निमगाव (मा) ४, भेंड १ अशा पध्दतीने एकूण ३२१ जण अपात्र झालेले आहेत.
अर्ज भरा ऑब्जेक्शन घेणारच
अपात्र झालेल्या उमेदवारांनाही ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले की आपणही निवडणूक लढवायला पाहिजे होती असे वाटते आहे. पण करायचे काय म्हणून ते हिरमुसल्या चेहऱ्याने गावात फिरून मर्जीतील नातेवाईक शोधत आहेत. जे जे उमेदवार अपात्र यादीत आहेत त्यांचे विरोधक मात्र त्यांच्यावर फॉर्म भरला की ऑब्जेक्शन घेण्यासाठी तयारी करीत आहेत. यामुळे अनेक अपात्र उमेदवारांची निराशा झाली आहे.
कोट :::::::::::
माढा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायत निवडणुकांत गेल्या वेळी खर्च मुदतीत न दिल्याने आयोगाने ज्यांना ज्यांना अपात्र केला आहे त्यांंचा सहा वर्षे अपात्र कालावधी असल्याने यंदाची निवडणूक लढता येणार नाही. जरी फॉर्म भरला तरी छाननीत तो बाद केला जाईल.
- राजेश चव्हाण,
तहसीलदार, माढा