शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

वीरशैव समाजभूषण पुरस्कारांचे वितरण

By admin | Published: June 23, 2014 1:11 AM

वीरशैव जीवन गौरव

सोलापूर : महाराष्ट्र वीरशैव सभेच्या वतीने समाजातील १९ जणांना वीरशैव जीवन गौरव तर बार्शीच्या माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांना मानाचा वीरशैव समाजभूषण पुरस्कार रविवारी सकाळी सिद्धेश्वर मंदिरात आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील-नागराळकर यांच्या हस्ते आणि सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा पार पडला. व्यासपीठावर आ. विजयकुमार देशमुख, आ. प्रणिती शिंदे, आ. सिद्रामप्पा पाटील, माजी आ. विश्वनाथ चाकोते, शिवशरण पाटील-बिराजदार, रतिकांत पाटील, महादेव पाटील, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, वीरशैव सभेचे संस्थापक डॉ. शिवमूर्ती शाहीर, प्रांतिक अध्यक्ष बाबासाहेब कोरे, प्रबुद्धचंद्र झपके, परिवहनचे सभापती आनंद मुस्तारे, सुभाष मुनाळे, अनिल सिंदगी, इंदुमती अलगोंडा-पाटील, तम्मा गंभीरे, समाजातील नगरसेवक, वीरशैव सभेचे विविध तालुकाध्यक्ष आदी उपस्थित होते.प्रारंभी जिल्हाध्यक्ष सिद्रामप्पा उण्णद यांनी स्वागत तर शहराध्यक्ष नंदकुमार मुस्तारे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर बसवराज पाटील- नागराळकर यांच्या हस्ते शिक्षण महर्षी बसवंत भरले (भंडारकवठे), शंकरेप्पा तांबे (माढा), उल्हास पाटील (किणी), विश्वनाथ नष्टे (माळशिरस), मोहन ठिगळे (पंढरपूर), चंद्रशेखर शिलवंत (टेंभुर्णी), यशवंत पाटील (तळसंगी), अण्णासाहेब साखरे (साखरेवाडी), भीमाशंकर कुर्डे (मोहोळ), आप्पाराव दर्गोपाटील, अ‍ॅड. अशोक ठोकडे, करबसप्पा आलमेलकर, बसवराज शास्त्री-हिरेमठ, सिद्धेश्वर बमणी, डॉ. राजेंद्र घुली, श्रीमंत माळगे, महादेवी लोणी, सुगलाबाई वाकळे यांना स्मृतिचिन्ह, सिद्धरामेश्वरांची प्रतिमा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन समाजभूषण पुरस्काराने तर माजी आ. प्रभाताई झाडबुके यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, सिद्धरामेश्वरांची मूर्ती देऊन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रभाताई झाडबुके यांनी आपल्या मनोगतातून समाजकारण, राजकारणातील आपल्या यशाची गुपिते मांडली. सत्ता मिळाल्यानंतर ती टिकवणे, तिचे संगोपन करणे मला जमल्याने आपण यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. शिस्त, वक्तशीरपणा आणि सर्वधर्मसमभाव हे तीन सूत्री मंत्र अवलंबल्यामुळेच २२ वर्षे नगराध्यक्ष तर १६ वर्षे आमदारकी भोगल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले- कापसे यांनी केले तर आभार राज पाटील यांनी मानले. यावेळी सिद्धय्या स्वामी, केदार उंबरजे, नरेंद्र गंभीरे, गुरुनाथ करजगीकर, महेश अंदेली, विजया थोबडे, पुष्पा गुंगे, सिद्रामप्पा अबदुलपूरकर, बाळासाहेब भोगडे, रेवणसिद्ध आवजे, मल्लिकार्जुन निरोळी, मदन झाडबुके, शिवलिंग पाटील, सोमनाथ चिवटे, उत्कर्ष शेटे, गिरीश नष्टे, अशोक करजाळे, बाळासाहेब आडके, मनोहर कवचाळे, श्रीधर कारंडे, अण्णासाहेब कोतली, डॉ. बसवराज बगले यांच्यासह देवस्थान पंच कमिटीचे पदाधिकारी, वीरशैव सभेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. -------------------------------------व्हायरस घुसू देऊ नका- झाडबुकेटक्केवारी हा शब्द आता प्रचलित झाला आहे. टक्केवारी दिल्याशिवाय आणि घेतल्याशिवाय कामे होतच नाहीत. नगराध्यक्ष, आमदार असताना टक्केवारीचा व्हायरस माझ्यापर्यंत येऊ दिलाच नाही. म्हणूनच बार्शी नगरपालिकेत असताना ९९ टक्के ठराव एकमताने झाले. त्यामुळे शहर विकासाला गती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. राजकारणातील मंडळींनी टक्केवारीचा व्हायरस तुमच्यात घुसू देऊ नका, असा सल्लाही प्रभाताई झाडबुके यांनी दिला.