सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांना ड्रेसकोड; गुरूजींना रोज काळी पॅन्ट-पांढरा शर्ट; ब्लेझर फक्त राष्टÑीय सणालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 01:40 PM2018-12-28T13:40:40+5:302018-12-28T13:43:59+5:30

सोलापूर : गेले तीन महिने कोटावरून तणावात असलेल्या गुरुजींना गुरुवारी झालेल्या झेडपी सभेत दिलासा देण्यात आला. आता कोट फक्तराष्ट्रीय ...

Dress code for teachers in Solapur district; Guruji daily pants-white shirt; Blazer is the only national imagination | सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांना ड्रेसकोड; गुरूजींना रोज काळी पॅन्ट-पांढरा शर्ट; ब्लेझर फक्त राष्टÑीय सणालाच

सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांना ड्रेसकोड; गुरूजींना रोज काळी पॅन्ट-पांढरा शर्ट; ब्लेझर फक्त राष्टÑीय सणालाच

Next
ठळक मुद्देसोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालीमागील सभेत शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय झाला होता.गेले तीन महिने कोटावरून तणावात असलेल्या गुरुजींना झेडपी सभेत दिलासा देण्यात आला

सोलापूर: गेले तीन महिने कोटावरून तणावात असलेल्या गुरुजींना गुरुवारी झालेल्या झेडपी सभेत दिलासा देण्यात आला. आता कोट फक्तराष्ट्रीय सणादिवशी गुरुजींनी घालायचा आहे, मात्र गुरुजींना काळी पॅन्ट व पांढरा शर्ट ड्रेसकोड म्हणून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे. 

सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला उपाध्यक्ष शिवानंद पाटील, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील, समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख, सीईओ डॉ. राजेंद्र भारूड, अतिरिक्त सीईओ अर्जुन गुंडे आदी उपस्थित होते. 
मागील सभेत शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय झाला होता.

ड्रेसकोडचा रंग ठरविताना शिक्षक संघटनांनी कोट अंगावर ओढवून घेतला. प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केल्यावर विरोध केल्याने वातावरण तापले होते. झेडपी अध्यक्ष शिंदे यांनी मध्यस्थी करून या सभेपर्यंत अंमलबजावणीस स्थगिती दिली होती. त्यामुळे आजच्या सभेत कोटाचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामुळे सभेला येताना अ‍ॅड. सचिन देशमुख, बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे समर्थनार्थ कोट घालूनच आले. तर उमेश पाटील व त्रिभुवन धार्इंजे हे विरोध करीत परिधान केलेल्या कोटावर रंगीत स्टिकरवर कोरड घशाला, कोट कशाला, खुळचट कल्पना, कोटाची वल्गना, कोटाचा दिखावा, विद्यार्थ्यांचा दुरावा अशा घोषवाक्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. सभेच्या सुरुवातीलाच उमेश पाटील यांनी कोटाचे काय करायचे, यावर ठराव घेण्याची विनंती केली. पण सभागृहाचा मूड लक्षात घेऊन अध्यक्ष संजय शिंदे यांनी सभा पटलावरील विषय संपल्यावर यावर चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगून सर्वांना गप्प केले. 

सभा पटलावर चार तर आयत्या वेळचे २० विषय मांडून चर्चेअंती मंजूर करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता कोटाचा विषय चर्चेला घेण्यात आला. तासभर या विषयावर घमासान चर्चा झाली. उमेश पाटील, त्रिभुवन धार्इंजे, शैलजा गोडसे यांनी आक्रमकपणे कोटाला विरोध केला. ड्रेसकोड बरा, पण कोटासाठी बंदुका ठेवून अंमलबजावणी करू नका, असे पाटील म्हणाले. सुभाष माने यांनी पार्श्वभूमी सांगत शिक्षक संघटनांनी कोट अंगावर ओढून घेतल्याचे स्पष्ट केले. कोटाचे काय करायचे ते करा, पण शिक्षकांना पांढरा शर्ट व काळी पॅन्ट असा ड्रेसकोड लागू करा, अशी मागणी केली. शिवाजी सोनवणे, मदन दराडे यांनी ड्रेसकोड हवा, असे सांगितले. 

अरुण तोडकर यांनी कोटापेक्षा उघड्यावर बसणाºया विद्यार्थ्यांच्या डोक्यावर छत देण्यास महत्त्व द्या, असे मत मांडले. पक्षनेते आनंद तानवडे यांनी सभागृहाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, असे सांगितले. कोट कधी वापरायचा याबाबत सीईओ डॉ. भारूड यांनी खुलासा केल्यावर वसंतराव देशमुख यांनी निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले. कोटाबाबत विनाकारण वेगळी चर्चा पसरवली, शिक्षकांना शिस्तीसाठी चांगलाच निर्णय आहे, असे ते म्हणाले. अ‍ॅड. सचिन देशमुख यांच्या भाषणानंतर मात्र सभागृहाचा रंग पालटला. 
शेवटी अध्यक्ष संजय शिंदे यांनी यावर निर्णय दिला. शिक्षकांनी आता कोट घेतलेच आहेत तर तो फक्त राष्ट्रीय सण व शिक्षक दिनादिवशी घालावा व आता नव्याने शिक्षकांना पांढरा शर्ट व काळी पॅन्ट हा ड्रेसकोड लागू करावा, महिलांसाठी साडीचा रंग ठरविण्यात यावा, असा नवीन ठराव मंजूर केला. 

दुष्काळावर कोरडीच चर्चा
- सभेच्या सुरुवातीलाच उमेश पाटील, त्रिभुवन धार्इंजे, संजय गायकवाड, वसंतराव देशमुख, अरुण तोडकर यांनी दुष्काळावर चर्चा घ्यावी म्हणून आग्रह केला. त्यावर अध्यक्ष शिंदे यांनी विषयानुरूप चर्चा करू आणि नंतर विभागनिहाय आढावा घेतल्यानंतर दुष्काळावर चर्चा करू, असे सांगितले. त्यावर धार्इंजे, देशमुख आक्रमक झाले. आतापर्यंत असे झालेले नाही. विषय संपल्यावर घाईत सभा उरकली जाते, असा आरोप त्यांनी केला. त्यावर अध्यक्ष शिंदे यांनी शब्द दिल्यावर सदस्य शांत झाले.

विषय संपल्यावर दुष्काळावर कोरडीच चर्चा झाली. संजय गायकवाड यांनी वळसंगचा पाणीप्रश्न गंभीर असून, चार टँकरची मागणी केली. पण टँकर मंजुरीचे अधिकार प्रांत अधिकाºयांना असल्याचे सीईओ डॉ. भारूड यांनी सांगितले. तालुकानिहाय तयार करण्यात आलेल्या टंचाई आराखड्यातील रकमेची तफावत उमेश पाटील यांनी निदर्शनाला आणून दिली. चर्चेअंती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची वेळ घेऊन महसूलच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत झेडपी सभागृहात यावर बैठक घेण्याचे आश्वासन अध्यक्ष शिंदे यांनी दिले. 

Web Title: Dress code for teachers in Solapur district; Guruji daily pants-white shirt; Blazer is the only national imagination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.