मोरवंचीतील भेगाळलेल्या भुईत गावकरी शोधतात पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:34 PM2019-05-21T12:34:30+5:302019-05-21T12:36:38+5:30

दुष्काळाची दाहकता ; गावतलाव आटला, टँकरच्या प्रस्तावातही अडथळे, शेती अन् दुधाचा व्यवसाय डबघाईला

Drinking water in search of villagers in peacocks | मोरवंचीतील भेगाळलेल्या भुईत गावकरी शोधतात पिण्याचे पाणी

मोरवंचीतील भेगाळलेल्या भुईत गावकरी शोधतात पिण्याचे पाणी

Next
ठळक मुद्देगावाला पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाºयासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली गावातल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीबरोबरच परिसरात ५० ते ६० विहिरी आहेत, वाड्या-वस्त्यांसह १६ हातपंप गावात आहेतहातपंपावर पाणी हापसायचे म्हणजे जीव मेटाकुटीला येतो. अशी अवस्था गावात पाहायला मिळाली

अशोक कांबळे

मोहोळ : पुरातन काळात ‘मोरेश्वर’ नावाने प्रसिद्ध असणाºया गावच्या महादेव मंदिराच्या नावावरून ‘मोरवंची’ नाव पडलेले हे गाव तुळजापूरकडे जाणाºया रोडवर आहे. एकेकाळी मुबलक पाणी व चारा असणाºया गावाला दिवसेंदिवस कमी पडत चाललेला पाऊस, गावाच्या परिसरात कॅनॉलला नसलेला बंधारा, अशा परिस्थितीत गावालगतच असणाºया भल्यामोठ्या तळ्यातील पाण्यावर गावाची तहान भागायची. मात्र, यंदा त्या तळ्यातही पाण्याचा टिपूस नसल्याने तळ्यातील भुईसुद्धा भेगाळली. यामुळे गावाला पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाºयासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे.

मोहोळ शहरापासून २७ किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या टोकाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया मोरवंची गावाला भर उन्हात दुपारी बारा वाजता भेट दिली. त्यावेळी पाण्याचे भीषण वास्तव समोर आले. जेमतेम १६०० लोकसंख्या असणाºया मोरवंची गावचे ग्रामदैवत मारुती मंदिरातच सरपंच प्रकाश वाघमारे यांची भेट झाली. वयाच्या पासष्टीकडे झुकलेले सरपंच प्रकाश वाघमारे यांनी गावात फिरवून पाण्याच्या समस्या मांडल्या. गावात ४५० कुटुंबे. पारंपरिक शेतीचा उद्योग अडचणीत येऊ लागल्याने शेतीबरोबरच दुधाचा व्यवसायही गावात चालतो. जवळपास दोन हजार जनावरे गावात आहेत.

गावातल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीबरोबरच परिसरात ५० ते ६० विहिरी आहेत. वाड्या-वस्त्यांसह १६ हातपंप गावात आहेत. परंतु, दरवर्षी पाऊस कमी पडत चालल्याने शेतकºयांनी शेतासह वस्तीवरही बोअर पाडले. ग्रामपंचायतीची पाणी पुरवठ्याची विहीरही कोरडी ठणठणीत पडली. म्हणून ग्रामपंचायतीने गावात पाणी पुरवठ्यासाठी तीन बोअर घेतले. त्यातील दोन पाण्याअभावी बंद पडले. एकाच बोअरवर गावासह कुंभार वस्ती, लोकरे वस्ती, पाटील-माने वस्ती, झोपडपट्टी परिसरातील सरवळे वस्ती अशा वस्त्यांसह गावाला पाळीने आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. आता ते बोअरसुद्धा उचक्या देऊ लागलंय. गावातल्या सगळ्याच हातपंपांनीही मान टाकलीय. एक-दोन हातपंप सुरू आहेत. परंतु, त्या हातपंपावर पाणी हापसायचे म्हणजे जीव मेटाकुटीला येतो. अशी अवस्था गावात पाहायला मिळाली.

गावालगतच पाण्यासाठी असणाºया भल्यामोठ्या तलावाने यावर्षी तळ गाठला. मोरवंचीकरांपुढे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे १५ दिवसांपूर्वी टँकरसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे.परंतु, प्रशासनाच्या जाचक अटींमुळे अडचणी येत असल्याचे सरपंच वाघमारे यांनी सांगितले.

सरपंचांनाही आणावे लागते सायकलवरून पाणी
- गावभर फिरून समस्या दाखविल्यानंतर सरपंच प्रकाश वाघमारे यांनी मारुती मंदिराजवळ सोडून गडबडीत निरोप घेतला. दरम्यान, गावात फेरफटका मारून मोहोळच्या दिशेने परत येताना गावाच्या बाहेर एक किलोमीटर अंतरावर एका वस्तीवरुन भर उन्हात अंगात बनियान, डोक्याला टापरं बांधून सायकलवर दोन घागरी व कळशी घेऊन निघालेले पासष्टीकडे झुकलेले गृहस्थ दिसले. पुढे जाऊन पाहिले असता गावचे सरपंच प्रकाश वाघमारे हे सायकलवरुन भर उन्हात घरी पाणी घेऊन निघाले होते. 

चिंचोली काटी एमआयडीसीमध्ये काम करून घरी आल्यावर विश्रांती मिळत नाही. पाण्याचा प्रश्न घरात बसू देत नाही. पाण्यासाठी गावात व गावाबाहेर भटकंती करावी लागते. पाण्याच्या वैतागाने दोन महिन्यांपूर्वीच घरासमोरची जनावरे विकावी लागली.
- सुभाष कुंभार, गावकरी

झोपडपट्टी परिसरातील सरवळे वस्तीवर सुमारे दीडशे घरे आहेत. गावातल्या बोअरचे पाणी कमी झाल्यामुळे वस्तीवर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पोरांना रात्रभर गाडीवरून पाणी आणावे लागते. प्रशासनाने तातडीने टँकरची व्यवस्था करावी.
- अनिरुद्ध पवार

Web Title: Drinking water in search of villagers in peacocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.