विश्वास संपादन केलेल्या चालकाने केला मालकाचा विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:23 AM2021-02-16T04:23:54+5:302021-02-16T04:23:54+5:30

दरम्यान, पिकअप मालकाने त्या चालकाचा त्याच्या घरी, नातेवाइकाकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही. याबाबत पिकअप मालक ...

The driver who acquired the trust betrayed the owner | विश्वास संपादन केलेल्या चालकाने केला मालकाचा विश्वासघात

विश्वास संपादन केलेल्या चालकाने केला मालकाचा विश्वासघात

Next

दरम्यान, पिकअप मालकाने त्या चालकाचा त्याच्या घरी, नातेवाइकाकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही. याबाबत पिकअप मालक कुमार बाळासाहेब कोंडुभैरी, रा. मंगळवेढा यांनी चालक मंगेश दिगंबर कोडग, रा. तळसंगी याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

मंगळवेढा येथील कुमार कोंडुभैरी यांच्या मालकीच्या एमएच १३-३८३३ या पिकअपवर तळसंगी येथील मंगेश कोडग हा बदली चालक म्हणून कामास होता. दरम्यान, ११ फेब्रुवारी रोजी सायं. ६ च्या सुमारास नरळेवाडी येथील शेतकऱ्याचे १०६ कॅरेट टोमॅटो भरून कुमार कोंडुभैरी व चालक मंगेश कोडग पणजी गोवा येथे पोहोच करण्यासाठी गेले होते. १२ रोजी स. ७ च्या सुमारास पणजीत टोमॅटो पोहोच करून त्याने

मागील राहिलेली व त्या दिवशीची असे एकूण एक लाख ७९ हजार रुपयांची रक्कम व्यापाऱ्याकडून घेऊन पिकअपच्या केबिनमध्ये ठेवली होती. पणजी येथून निघून तिसऱ्या दिवशी दि. १३ रोजी स. ९ च्या सुमारास सांगोला एसटी स्टँडसमोर चहा व नाश्त्यासाठी थांबले. त्यावेळी ही रोकड पिकअपमध्येच होती.

त्यानंतर मालक कुमार कोंडुभैरी मंगळवेढा येथे घरी गेले. दरम्यान, काही वेळाने पिकअप पुन्हा नरळेवाडी येथे टोमॅटो भरण्यासाठी पाठवायचे असल्याने त्यांनी चालक मंगेश कोडग यास फोन केला असता त्याचा फोन बंद लागला म्हणून मित्र सचिन शिंदे यास एसटी स्टँडसमोर पाठविले. त्याठिकाणी पिकअप उभे होते, परंतु चालक दिसून आला नाही. म्हणून त्यांनी कुमार कोंडुभैरी यांना तसे कळविले. मालक कोंडुभैरी यांनी

तत्काळ सांगोला येथे येऊन पिकपमध्ये ठेवलेली रोकड पाहिली असता ती मिळून आली नाही.

Web Title: The driver who acquired the trust betrayed the owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.