प्रापर्टीच्या वादामुळे मुलांनं केली वडिलाला लाकडानं बेदम मारहाण
By विलास जळकोटकर | Published: June 7, 2023 07:26 PM2023-06-07T19:26:42+5:302023-06-07T19:26:52+5:30
रागाच्या भरामध्ये मुलानं लाकडाने मारहाण केली.
विलास जळकोटकर / सोलापूर : प्राॅपर्टीच्या वादातून पोटच्या मुलानं चक्क लाकडानं वडिलाला बेदम मारहाण केली. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी (ता. अक्कलकोट) येथे मंगळवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास ही घटना घडली. महादेव माळप्पा ्व्हनकोरे (वय- ५३) असे जखमी वडिलाचे नाव आहे.
यातील जखमी महादेव व मुलामध्ये प्रॉपर्टीबद्दल वाद सुरु होता. मंगळवारी या कारणावरुन वाद पेटला. रागाच्या भरामध्ये मुलानं लाकडाने मारहाण केली. यामुळे महादेव यांच्या उजव्या हाताला, पायाला जखम झाली. दुपारी साडेतीनच्या सुमारास महादेव स्वत: शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. सि्व्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.