वाळूजमध्ये वीजबिल दुरुस्ती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:23 AM2021-03-17T04:23:07+5:302021-03-17T04:23:07+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वाळूज : मोहोळ तालुक्यात वाळूज येथे ‘महावितरण आपल्या गावी’ या योजनेंतर्गत वीजबिल दुरुस्ती व घरगुती, शेतीपंपासाठी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाळूज : मोहोळ तालुक्यात वाळूज येथे ‘महावितरण आपल्या गावी’ या योजनेंतर्गत वीजबिल दुरुस्ती व घरगुती, शेतीपंपासाठी वीजजोडणी शिबिर राबविण्यात आले.
यावेळी वीजबिल दुरुस्ती तसेच घरगुती शेतीपंपासाठी वीजजोडणी अर्ज स्वीकारण्यात आले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी घरगुती, व्यापारी व औद्योगिक वीजविले भरून घेण्यात आली. तसेच वाळूज येथे ३३ केव्हीचे उपकेंद्र मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली. मानेगाव येथून १७ लाख रुपये खर्च करून पोल टाकण्यात आले. याचा फायदा वाळूजसह भैरेवाडी, मनगोळी या गावांना होणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता हेमत ताकपेरे यांनी दिली. यावेळी महावितरणचे ग्रामीणचे कार्यकारी अभियंता ओमसिद्ध हुवाळे, उपअभियंता हेमंत ताकपेरे, शाखा अभियंता सत्यजित आंबरे, प्रा. प्रकाश कादे, सुशांत कादे, रवी कांबळे, सोमा सुतार, हरी कादे उपस्थित होते.