वीज गायब झाली अन् मोबाईल बॅटरीच्या उजेडात जिल्हाधिकाºयांनी तपासली शेतकºयांच्या बँकेची खाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 03:31 PM2020-01-10T15:31:24+5:302020-01-10T15:33:57+5:30

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेला आली गती

Electricity disappeared and in the light of mobile battery, District 2 inspected farmers' bank accounts | वीज गायब झाली अन् मोबाईल बॅटरीच्या उजेडात जिल्हाधिकाºयांनी तपासली शेतकºयांच्या बँकेची खाती

वीज गायब झाली अन् मोबाईल बॅटरीच्या उजेडात जिल्हाधिकाºयांनी तपासली शेतकºयांच्या बँकेची खाती

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकºयांच्या खात्याची तपासणी करीत असतानाच बँकेतील वीज गेलीमोहोळचे तहसीलदार जीवन बनसोेडे यांनी आपला मोबाईल काढून बॅटरी सुरू केलीशेतकरी कर्जमुक्ती संदर्भात बँकांनी केलेल्या तयारीची माहिती घेतली

सोलापूर : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांचे कामकाज कसे चालले आहे, याची खातरजमा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे मंगळवारी सायंकाळी मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत गेल्यावर वीज गायब झाली अन् मोबाईल बॅटरीच्या उजेडात त्यांनी शेतकºयांची खाती तपासली. 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी लाभार्थी शेतकºयांची खाती जानेवारीअखेर आधार लिंक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बँकांकडून हे कामकाज कसे चालले आहे, याची माहिती घेण्यासाठी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी मोहोळ तालुक्याचा दौरा केला. 

लांबोटी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेला भेट दिली. बँक अधिकाºयांकडून त्यांनी लाभार्थी शेतकºयांच्या खात्याची माहिती घेतली. ही खाती आधारशी संलग्न करण्यात आली आहेत काय, याची त्यांनी खातरजमा केली. 

शेतकºयांच्या खात्याची तपासणी करीत असतानाच बँकेतील वीज गेली. त्यामुळे कामकाज थांबणार होते. मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोेडे यांनी आपला मोबाईल काढून बॅटरी सुरू केली. मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात जिल्हाधिकारी भोसले यांनी शाखा व्यवस्थापक यु. के. बागेवाडीकर यांच्याकडून दोन लाखांपर्यंतच्या थकीत कर्जदारांची यादी व त्यांचे खाते आधारशी संलग्न करण्यात आले काय, याबाबत माहिती घेतली. त्यानंतर डॉ. भोसले यांनी मोहोळ येथील भारतीय स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, महाराष्ट्र बँक, आयडीबीआय बँकेच्या शाखेस भेट दिली. या भेटीत त्यांनी शेतकरी कर्जमुक्ती संदर्भात बँकांनी केलेल्या तयारीची माहिती घेतली. 

यावेळी स्टेट बँकेचे व्यवस्थापक सचिन कसबे, बँक आॅफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक अविनाश मेकेन्ना, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत कांबळे आणि आयडीबीआयचे व्यवस्थापक मनोज दराडे यांनी माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, अग्रणी बँकेचे अधिकारी अनुराग खंडागळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.


शेतकºयांची कर्जमाफीची यादी मराठीत द्या...
- कर्जमाफीसाठी बँकांनी लाभार्थी शेतकºयांची खाती आधारकार्ड क्रमांकाशी संलग्न केलेली व न केलेली यादी मराठी भाषेत तयार करावी. ही यादी बँकेच्या नोटीस बोर्डवर तसेच ग्रामपंचायतीमध्ये प्रदर्शित करावी, या यादीची प्रत तहसीलदार कार्यालय आणि सहनिबंधक कार्यालयास द्यावी असे कळविले आहे़

Web Title: Electricity disappeared and in the light of mobile battery, District 2 inspected farmers' bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.