मार्चअखेर पंढरपूर हागणदारीमुक्त करा
By admin | Published: March 15, 2017 06:00 PM2017-03-15T18:00:29+5:302017-03-15T18:00:29+5:30
पंढरीच्या दारी स्वच्छतेची वारी धोरण विशेष अभियानामध्ये पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष योगदान देऊन पंढरपूर तालुका येत्या मार्चअखेर हागणदारीमुक्त करा
Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 15 - पंढरीच्या दारी स्वच्छतेची वारी धोरण विशेष अभियानामध्ये पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष योगदान देऊन पंढरपूर तालुका येत्या मार्चअखेर हागणदारीमुक्त करा असे आवाहन स्वच्छ भारत मिशनचे विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे यांनी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी पंढरपूर तालुका हागणदारी मुक्त करणेसाठी विश मोहिम राबविली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून पंढरपूर येथे आत्मसन्मान कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत युनिसेफ चे स्वच्छता विभागाचे राज्य सल्लागार जयंत देशपांडे यांनी विशेष आराखडा तयार करून नियोजन केले आहे. या नियोजनाच्या अंमलबजावणी करणेसाठी आज बैठकीचे आयोजन करणेत आले होते. पंढरीच्या दारी स्वच्छतेची वारी धोरण विशेष अभियानअंतर्गत पंढरपूर पंचायत समितीमध्ये नियोजन बैठकीत मार्गदर्शन करताना विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे हे बोलत होते. ते म्हणाले , पंढरपूर तालुक्यातील २४ गावामधील सुमारे १५० पेक्षा जास्त वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट येत्या २५ मार्च पर्यंत साध्य करण्यासाठी विशेष मोहिम राबविली जाणार आहे.यासाठी विशेष पालक अधिकारी नेमून मोहिम प्रभावीपणे आणि सुक्ष्मरित्या राबविली जाणार आहे.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) राजेंद्र अहिरे सर , गट विकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , सचिन सोनवणे , शंकर बंडगर , महादेव शिंदे , प्रशांत दबडे , यशवंती धत्तुरे , अर्चना कनकी , विस्तार अधिकारी भारत रेपाळ , उत्तम साखरे , हरिहर हजारे , शांतीलाल आदमाने , सुनिता राठोड , सुजाता साबळे , सावित्री गायकवाड , राहूल बाबरे आदी उपस्थित होते.
याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) राजेंद्र अहिरे म्हणाले , स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम साधारणतः १५० पेक्षा जास्त असलेली पंढरपूर तालुक्यातील कासेगाव , भोसे , तुंगत , बोहाळी , खर्डी , कोर्टी , पूळूज , रांजणी , भाळवणी , भंडीशेगाव , शेवते , गार्डी , केसकरवाडी , बाभुळगाव , सांगवी , पिराची कुरोली , देवडे , सोनके , लक्ष्मी टाकळी , रोपळे , जळोली , तिसंगी या २४ गावांचा समावेश आहे.