शेवटची संधी म्हणून दिली परीक्षा अ्न बनले अधिकारी, जिद्दी तरूणाची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 10:58 AM2020-01-12T10:58:26+5:302020-01-12T11:01:52+5:30
काळानेच पंडित वाकडे यांच्या जिद्दी समोर हार पत्करली त्यांच्या यशाने बोकडदरवाडी ता माढा या दुष्काळ पट्ट्यातील अधिकारी म्हणून ओळख झाली.
- अमर गायकवाड
माढा : अभ्यासात हुशार नसल्याने चौथीत शाळा सोडावी लागली. पुन्हा तीन वर्ष रोजंदारी ची कामे केली त्यानंतर शिक्षणाचे महत्त्व कळले आणि मला शिकायचंय असा हट्ट करीत पाचवीपासून पुन्हा शिक्षणाचा श्रीगणेशा केला. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले शिक्षकाचे नोकरीही लागली मात्र अधिकारी होण्याचे स्वप्न होते. एक नव्हे तब्बल दहा वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पण अपयशच अखेर शेवटची संधी म्हणून परीक्षा दिली आणि अधिकारी होण्याचे स्वप्न साकार झाले.
काळानेच पंडित वाकडे यांच्या जिद्दी समोर हार पत्करली त्यांच्या यशाने बोकडदरवाडी ता माढा या दुष्काळ पट्ट्यातील अधिकारी म्हणून ओळख झाली. पंडित वाकडे यांनी स्वतःवर विश्वास ठेवत प्रामाणिकपणे कष्ट करून कुटुंबाबरोबर गावाचा नावलौकिक वाढविला. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने शिक्षणात हुशार नसल्याने कुटुंबीयांच्या आग्रहाखातर चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर तीन वर्ष शाळेची सोडून दिली व या कालावधीत दगडे फोडणे, रोजंदारीवर कामाला जाणे अशी कामे करत असतानाच शिक्षणाची गोडी लागलेल्या पंडितने वडील व चुलते यांच्याकडे शाळेत जाण्यासाठी आग्रह धरला.
त्यानंतर पाचवीला पुन्हा प्रवेश घेऊन शैक्षणिक कारकिर्दीला नव्याने सुरुवात केली.शाळा घरापासून लांब आसल्याने माढ्यातील झेडपीच्या शाळेतील समता विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश घेत अहोरात्र परिश्रमाने शिक्षण घेतले व मोठे स्वप्न असून देखील घरच्या परिस्थितीमुळे वाशीम जिल्ह्यातील झेडपीच्या वरिष्ठ प्राथ. शाळा, पांगरी धनकुटे ता.मालेगाव जि.वाशीम येथे विज्ञान पदवीधर शिक्षक म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. मात्र त्यांच्या ध्येयापासून विचलित न होण्याचा सल्ला मित्रांनी दिल्यानंतर मागील 10 वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य परीक्षेच्या अभ्यासाची तयारी चालू केली. मात्र यामध्ये देखील अनेकदा अपयश आले.
नोकरीसाठी वय संपत आल्याने शेवटची संधी म्हणून आता नाही तर कधीच नाही या उद्देशाने रजा टाकून अहोरात्र मेहनत घेतली.त्यामुळे वयाच्या 40 व्या वर्षी "जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी /बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) क्लास 2(राजपत्रित )" पदासाठी निवड झाली आहे. या परिक्षेचा 21 जून 2019 रोजी अंतिम निकाल जाहीर झाला.या निकालात राज्यात 19 वा तर एनटीसी संवर्गातून प्रथम क्रमांकाने यश संपादन केले आहे.
48 तरुण शासकीय सेवेत कार्यरत
महाराष्ट्र राज्य महामंडळाची बस या गावाने पाहिली नसून दगड फोडून उदरनिर्वाह करणारे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावातील तरुणांनी तरूणांनी बदलली असून दुष्काळी पट्ट्याला अधिकारी अशी ओळख मिळण्यासाठी प्रयत्नन केले आहेत. तहसीलदार ग्रामसेवक बालविकास अधिकारी पोलीस यासह अनेक पदावर 48 तरुण सेवा बजावत आहेत.
(एकरात टोमॅटो अन् काकडीपासून साडेपाच महिन्यांत तेरा लाख)
(२०० देशांच्या नोटा, नाणी अन् टपाल तिकिटांचा केलाय त्याने संग्रह)
(लऊळच्या तुकाराम ढोरेंची किमया; ७० दिवसांत १५ लाखांचे खरबूज)