पक्षांतर्गत बंदी कायद्याची भावी जि़प़अध्यक्षांना धास्तीव्हिप मोडणार का ?: दोन्ही गटांकडे काटावरचे बहुमत,कोण जिंकणार याची उत्सुकता सोलापूर: शिवाजी सुरवसे सर्वाधिक २३ जागा जिंकून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणाऱ्या राष्ट्रवादीकडे ह्यकाटावरचेह्ण बहुमत आहे तर बहुमत नसतानाही गोवा आणि मणिपूर राज्याप्रमाणे ह्यचमत्कारह्ण करु पाहणाऱ्या महाआघाड्यांना आता पक्षांतर्गत बंदी कायद्याची धास्ती वाटू लागली आहे़ वरवर पाहता अकलूजचे मोहिते-पाटील विरुध्द माढ्याचे शिंदे बंधू यांच्यातील ही ह्यदंगलह्ण दिसते त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता जिल्हा परिषदेला लागली आहे़ भाजप महाआघाडीकडून जि़प़ अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे़ अडीच वर्षे जि़प़ अध्यक्ष म्हणून काम करावयाचे आणि त्यानंतर करमाळ्यातून विधानसभा लढवायची असा फंडा संजय शिंदे यांचा आहे़ त्याला मोहिते-पाटलांनी शह देण्याचे नियोजन केले आहे़ राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडूण आलेले २३ काँग्रेसच्या चिन्हावर निवडूण आलेले ७, सांगोल्यातील शेकाप ३ व दिपक साळुंखे यांचे २ असे सदस्य न फाटाफूट होता एकत्र आले तरच त्यांना ३५ ही मॅजिक फिगर गाठता येते आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष होऊ शकतो़ याला फाटा देऊन संजय शिंदे यांनी ३८ सदस्यांचा ह्यआकडाह्ण निश्चित केला आहे़ त्यामुळे चमत्कार होईल का हे देखील औसुक्याचे आहे़ राष्ट्रवादीबरोबर आघाडी करु म्हणणाऱ्या काँग्रेसचे आ़ म्हेत्रे यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही़ राष्ट्रवादीकडून कोणाचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येणार यावरही बरीच गणिते ऐनवेळी बदलणार आहेत़माढ्यातील सात सदस्य गैरहजर राहतील किंवा सभागृहात तटस्थ राहतील अशी व्यूहरचना आखली जात आहे़ त्यामुळे अध्यक्षपदासाठी प्रथमच जोरदार चुरस निर्माण झाली आहे़ येत्या २१ मार्च रोजी जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जि़प़अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीसाठी नवनिर्वाचित जि़प़ सदस्यांची पहिली सभा होणार आहे़ आता उणेपुरे पाच दिवस राहिल्यामुळे अध्यक्षपदाची चुरस रंगतदार बनली आहे़ राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष असला तरीही अध्यक्षपदाच्या नावावर एकमत होत नसल्याचे दिसते़ १९ तारखेच्या बैठकीत सर्व काही निश्चित होईल असे दिसते़बळीराम साठे यांची राष्ट्रवादीने गटनेता म्हणून नियुक्ती केली असली तरीही अद्याप सदस्यांसाठी व्हीप काढला नाही़ राजकारणात काहीही होऊ शकते या प्रमाणे काय होणार याची खलबते सुरू आहेत़ ़़़़--------------------काय आहे पक्षांतर बंदी कायदा !जि़प़ सदस्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू केला आहे़निवडूण आल्यानंतर राजकीय पक्षांचे किंवा आघाडीच्या सदस्यांनी इतर पक्षामध्ये प्रवेश केल्यास त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यान्वये कारवाई होऊ शकते़ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ मधील कलम ३ नुसार पक्षांतर करणाऱ्या सदस्यांना अपात्र करणे आणि त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यावर बंदी घालण्याची तरतूद आहे़पक्षांने जो व्हीप काढला आहे त्याविरोधात कृत्य केले तरीही पक्षांतर बंदी कायदा लागू होतो़ त्यामुळे आता राष्ट्रवादी व्हीप काढणार का तो मिळालाच नाही असे काही सदस्य मुद्दाम सांगू शकतात मग हा कायदा लागू होऊ शकतो का असे अनेक शंका-कुशंका पुढे येऊ लागल्या आहेत़ त्यामुळे राजकीय पंडीत कायद्याचा अभ्यास करुन आकडेमोड करत आहेत़---------------------------------जुळवा तुमची गणिते-राष्ट्रवादी-२३-काँग्रेस-७-दिपक साळुंखे व गणपतराव देशमुख-५-भाजप -१४-शिवसेना-५-परिचारक गट-३-शहाजीबापू पाटील-२-महाडीक गट-३-आवताडे गट-३-संजय शिंदे यांचे-२ -सिद्रामप्पा पाटील गट-१-------------------------
जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविल्या नोटीसाजिल्हा परिषदेच्या नूतन सदस्यांची पहिली बैठक जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि़ २१ मार्च रोजी दुपारी दोन वाजता होणार असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने प्रत्येक जि़प़ सदस्यांना सभेची नोटीस पाठविली आहे़या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडला जाणार असून त्याच दिवशी सकाळी १० ते १२ यावेळेत जि़प़ सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्षांची नामनिर्देशनपत्रे स्विकारली जाणार आहेत़ दुपारी दोन वाजता सभा सुरू होईल़ उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल आणि त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुका हात वर करुन घेतल्या जाणार आहेत़