अखेर गुन्हा दाखल; महापालिकेचे उपायुक्त अभिजित बापट यांच्यावर 'आपत्ती' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:52 AM2020-06-05T11:52:13+5:302020-06-05T11:54:01+5:30

दणका : महापालिकेचे कामचुकार अधिकारी आयुक्तांच्या रडारवर

Finally filed a crime; 'Disaster' on NMC Deputy Commissioner Abhijit Bapat | अखेर गुन्हा दाखल; महापालिकेचे उपायुक्त अभिजित बापट यांच्यावर 'आपत्ती' 

अखेर गुन्हा दाखल; महापालिकेचे उपायुक्त अभिजित बापट यांच्यावर 'आपत्ती' 

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्याला रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी विशेष नियोजन कर्मचा?्यांना कामे नेमून दिली आहेत. कामचुकार कर्मचा?्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत गुन्हा होईलकामगार कल्याण अधिकारी विजयकुमार कांबळे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

सोलापूर : महापालिकेचे नवे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सुस्तावलेल्या यंत्रणेला धक्के द्यायला सुरुवात केली आहे. महापालिका उपायुक्तपदी नेमणूक होऊनही रुजू न झाल्याने अभिजित बापट यांच्यावर सदर बझार पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेतील इतर कामचुकार कर्मचारी रडारवर आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले. 

अभिजित बापट यांची २४ जुलै २०१९ रोजी मनपा उपायुक्तपदी पदस्थापना झाली होती. पण ते रुजू झाले नाहीत. सांगली भागात पूर आल्यानंतर त्यांची सेवा सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडे त्यांची वर्ग केली होती. ४ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांना पुन्हा सोलापूर मनपाकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर बापट यांनी वैद्यकीय रजेची मागणी केली. रजेचा कालावधी संपल्यानंतरही ते रुजू झालेले नाहीत. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर ३० मे २०२० रोजी त्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यांनी समाधानकारक खुलासा न केल्याने त्यांच्याविरुध्द फिर्याद देण्याचे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले. कामगार कल्याण अधिकारी विजयकुमार कांबळे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्याला रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी विशेष नियोजन केले आहे. कर्मचा?्यांना कामे नेमून दिली आहेत. कामचुकार कर्मचा?्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत गुन्हा होईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

Web Title: Finally filed a crime; 'Disaster' on NMC Deputy Commissioner Abhijit Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.