...अखेर वीजवितरणने तोडलेले कनेक्शन जोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:22 AM2021-07-26T04:22:01+5:302021-07-26T04:22:01+5:30

वीजवितरण कंपनीने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले देऊन सळो की पळो करून सोडले आहे. पैसे न भरल्यामुळे वीजवितरणच्या अधिकाऱ्यांनी मंगळवेढा ...

... Finally the power supply reconnected the disconnected | ...अखेर वीजवितरणने तोडलेले कनेक्शन जोडले

...अखेर वीजवितरणने तोडलेले कनेक्शन जोडले

Next

वीजवितरण कंपनीने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले देऊन सळो की पळो करून सोडले आहे. पैसे न भरल्यामुळे वीजवितरणच्या अधिकाऱ्यांनी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात घरगुती, उद्योग व शेतीपंपाच्या थकीत बिलापोटी कनेक्शन कट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. साखर कारखान्यांनी १५०० रुपयांच्या पुढील रक्कम अदा न केल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. वारंवार पडणाऱ्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने गोरगरीब मजुरांना कामे नसल्यामुळे तेही आर्थिक अडचणीत आहेत.

अशा परिस्थितीत वीजवितरणने रेटून वसुली सुरू केली आहे. मंगळवेढा शहरात ३० घरगुती ग्राहकांचे कनेक्शन बंद केल्याचे समजताच जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह संध्याकाळी ७.३० वा. वीजवितरण कार्यालयात येऊन कनिष्ठ अभियंता कोळेकर यांना घेराव घालत घोषणाबाजी केली. यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहून वीजवितरणच्या अधिकाऱ्यांनी माघार घेत तोडलेले वीजकनेक्शन पूर्ववत केले.

यावेळी रघुनाथ चव्हाण, बीरू ढेकळे, बाळासाहेब नागणे, किशोर दत्तू, पप्पू दत्तू, अनिल दत्तू, उमेश दत्तू, अमोल माळी, नेताजी बाबर, शिवाजी कांबळे, सुरेश मुदगूल, सुखदेव डोरले, राजेंद्र मेहेरकर, बंडू मेहेरकर, रवी चेळेकर, धनंजय नवाळे यांच्यासह ३० ते ४० कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

ओळी ::::::::::::::::::::::

वीजवितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता कोळेकर यांना प्रभाकर देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याचे छायाचित्र.

Web Title: ... Finally the power supply reconnected the disconnected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.