अखेर ठरलं; सोलापुरात १६ ते २६ जुलै दरम्यान कडक संचारबंदीची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 09:22 PM2020-07-11T21:22:46+5:302020-07-11T21:34:40+5:30
ग्रामीण भागातील ज्या भागात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त आहे तेथेही असणार संचारबंदी
सोलापूर : सोलापूर शहर व पसिरात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अखेर आज लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. १६ ते २६ जुलै या कालावधीत सोलापूर महापालिका हद्दीसह शेजारच्या ज्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे अशा गावांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
दरम्यान, १६ जुलैपासून होणाऱ्या लॉकडाऊनची सविस्तर नियमावली, लॉकडाऊन कालावधीत काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार? याबाबतचा सविस्तर आदेश येत्या एक ते दोन दिवसांमध्ये घेतला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=891481434680539&id=305668769928478
यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.