कारी येथे आर्थिक साक्षरता शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:46 AM2020-12-05T04:46:56+5:302020-12-05T04:46:56+5:30

कारी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेने कारी येथे नाबार्डच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता शिबिर राबविले. माजी उपसरपंच ...

Financial literacy camp at Kari | कारी येथे आर्थिक साक्षरता शिबिर

कारी येथे आर्थिक साक्षरता शिबिर

Next

कारी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेने कारी येथे नाबार्डच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता शिबिर राबविले.

माजी उपसरपंच अशोकराव गायकवाड, दत्ता देसाई, सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव उपस्थित होते. बँकेचे प्रशासक कोतमिरे व सरव्यवस्थापक मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा स्थरावर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात बँकेच्या विविध योजनांसोबतच अटल विमा आणि विविध ठेवींवर व्याज कसे मिळवावे, याबाबत मार्गदर्शन केले. नियमितपणे कर्जफेड कशी करावी व विविध कार्यकारी सोसायटीचे शंभर टक्के वसूल झाल्यानंतर संस्थेला कसा फायदा होतो हे शाखाधिकारी खळदकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपव्यवस्थापक पाटील, पालक अधिकारी सुरवसे वरिष्ठ बँक निरीक्षक यांनी मार्गदर्शन केले. लिपिक आबासाहेब घावटे तर आभार बँक इन्स्पेक्टर गायकवाड यांनी मानले. यावेळी कारी, गाेरमाळे, टाेणेवाडी व परिसरातील बहुसंख्य शेतकरी व ठेवीदार उपस्थित हाेते.

-----

फोटो : ०४ कारी

कारी येथे आर्थिक साक्षरता शिबिरात मार्गदर्शन करताना प्रशासक कोतमिरे

Web Title: Financial literacy camp at Kari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.