सोलापूर : दक्षिण कसबा शिंदे चौकातील मारूती टेळे संकुलात असलेल्या हॉस्पिटलला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
मारूती टेळे संकुलात डॉ. गिरीष वसंत काळे यांचे हॉस्पिटल व पॅथॉलॉजी आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पॅथॉलॉजीमध्ये विजेचा शॉटसर्किट झाला. विजेच्या ठिणग्यांनी पॅथॉलॉजीमध्ये आग लागली. आग लागल्याचे समजताच बाहेरील बाजुस असलेला कर्मचारी संकुलाच्या बाहेर पडला व त्याने अग्निशामक दलास पाचारण केले.
तत्काळ भवानी पेठ, रविवार पेठ आणि सावरकर मैदान येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. आगीत आतमधील मशिनरी, केमिकल, फर्निचर, खुर्च्या, टेबल, पीओपी आदी साहित्य जळुन खाक झाल्याचे निदर्शनास आले. आगीत साडे चार ते पाच लाखचे नुकसान झाले असण्याची शक्यता अग्निशामक दलाचे अधिक्षक केदार आवटे यांनी दिली. ---------आतील कर्मचाºयाने टाकली खिडकीतुन उडी- पॅथॉलॉजीमध्ये दोन कर्मचारी रात्री कामाला होते़ एक कर्मचारी बाहेर तर दुसरा पॅथॉलॉजीमध्ये झोपला होता. अचानक आग लागल्यानंतर आतील कर्मचाºयाला बाहेर पडता येत नव्हते. आग आणि धुरामुळे तो आतमध्ये गुदमरला होता. त्याने खिडकी उघडली व त्यातुन बाहेर उडी मारली. पहिल्या मजल्यावरून पडल्याने कर्मचारी जखमी झाला.