Breaking; कामती येथील टायर दुकानाला लागली आग; एक कोटी रुपयाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 06:56 PM2020-10-26T18:56:27+5:302020-10-26T18:57:50+5:30

अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; आग विजविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू

A fire broke out at a tire shop in Kamati; Loss of one crore rupees | Breaking; कामती येथील टायर दुकानाला लागली आग; एक कोटी रुपयाचे नुकसान

Breaking; कामती येथील टायर दुकानाला लागली आग; एक कोटी रुपयाचे नुकसान

googlenewsNext

कामती : मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथील टायर व रिमोल्डिंग दुकानाला आग लागल्याने सुमारे एक कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. कामती पोलिसांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमक पथकाचे पाचारण केल्यावर आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशामक दलाने केले.

कामती बुद्रुक येथील जावेद सय्यद यांच्या टायर आणि रिमोल्डिंग दुकानाला काल सायंकाळी साडे पाचच्या सुमारास विजेच्या तांत्रिक समस्यामुळे आग लागली.आग लागताच दुकान मालकांनी दुकान मालकांनी दुकानातील टायर व टायर रिमोल्डिंग सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.परंतु आगीने रोद्ररूप धारण केल्याने दुकानातील लाखो रुपयाचे सामान जळून खाक झाले.

दुकानाचे मालक जावेद सय्यद यांनी सोमवारी जवळपास वीस ते तीस लाख रुपयांची नवीन टायर केली होती. नवीन टायरंपैकी अजून एकही टायर विक्री झाली नव्हती. आग लागताच मालकांनी कामती पोलिसांना बातमी कळवली. कामती पोलीस ठाण्याचे सपोनि किरण उंदरे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अग्नीशामक दलास पाचरण केले. अग्निशामक दलाच्या साहाय्याने आग विझवण्याचे काम चालू आहे.

Web Title: A fire broke out at a tire shop in Kamati; Loss of one crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.