कामती : मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथील टायर व रिमोल्डिंग दुकानाला आग लागल्याने सुमारे एक कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. कामती पोलिसांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमक पथकाचे पाचारण केल्यावर आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशामक दलाने केले.
कामती बुद्रुक येथील जावेद सय्यद यांच्या टायर आणि रिमोल्डिंग दुकानाला काल सायंकाळी साडे पाचच्या सुमारास विजेच्या तांत्रिक समस्यामुळे आग लागली.आग लागताच दुकान मालकांनी दुकान मालकांनी दुकानातील टायर व टायर रिमोल्डिंग सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.परंतु आगीने रोद्ररूप धारण केल्याने दुकानातील लाखो रुपयाचे सामान जळून खाक झाले.
दुकानाचे मालक जावेद सय्यद यांनी सोमवारी जवळपास वीस ते तीस लाख रुपयांची नवीन टायर केली होती. नवीन टायरंपैकी अजून एकही टायर विक्री झाली नव्हती. आग लागताच मालकांनी कामती पोलिसांना बातमी कळवली. कामती पोलीस ठाण्याचे सपोनि किरण उंदरे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अग्नीशामक दलास पाचरण केले. अग्निशामक दलाच्या साहाय्याने आग विझवण्याचे काम चालू आहे.