धनगर आरक्षणासाठी माळशिरस तीन तास सर्वपक्षीयांचा रास्ता रोको
By दिपक दुपारगुडे | Published: September 14, 2023 04:48 PM2023-09-14T16:48:46+5:302023-09-14T16:49:14+5:30
सकाळी १० पासून ठिय्या मारला
दीपक दुपारगुडे, सोलापूर: मराठा आरक्षणाचा वादळ घोंगावत असतानाच धनगर आरक्षणासाठी माळशिरस येथील प्रमुख अहिल्या चौकात सकाळी १० पासून ठिय्या मारला. ३ तास सुरू असलेल्या आंदोलनात विविध पक्षातील वेगवेगळ्या संघटनांनी पाठिंबा दर्शवीत रास्ता रोकोत सहभाग नोंदवला. यावेळी पालकमंत्र्यांचा निषेध मंदिरात आला, मुस्लिम समाज संघटना, मराठा समाज संघटना, नाभिक समाज संघटना, होलार समाज संघटना सह विविध संघटनांचे समर्थन होते. मराठा व धनगर आरक्षणासाठी एकत्रित आंदोलन व्हावे, आरक्षण न देणाऱ्या सरकारमध्ये राहू नये, आरक्षण लढ्यात राजकारण नको, न्यायालयीन लढाईसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, अशी भूमिका उपस्थित कार्यकर्त्यांनी मांडली. या रास्ता रोकोमुळे मुख्य चौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. जवळपास दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी मागण्याचे निवेदन देत रास्ता रोकोची सांगता झाली . आ.रामहरी रूपणवर ,उत्तमराव जानकर ,धैर्यशील मोहिते पाटील , डॉ मारुती पाटील बाळासाहेब सरगर , लक्षण हाके,अँड सोमनाथ वाघमोडे , अँड एम एम मगर , बाबासाहेब माने - पाटील , पांडुरंग वाघमोडे , सुरेश टेळे , आजीत बोरकर ,के.पी.काळे सह विविध पक्षातील नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.