वन विभागाची स्पष्टोक्ती; म्हणे.. गाय-वासरावर बिबट्यानं नव्हे तरसानं केला हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 01:11 PM2020-12-16T13:11:38+5:302020-12-16T13:11:43+5:30

केसाचे व पायाच्या ठशावरुन निष्कर्ष

Forest Department outspokenness; Says .. The attack on the cow and calf was not by leopard but by fear | वन विभागाची स्पष्टोक्ती; म्हणे.. गाय-वासरावर बिबट्यानं नव्हे तरसानं केला हल्ला

वन विभागाची स्पष्टोक्ती; म्हणे.. गाय-वासरावर बिबट्यानं नव्हे तरसानं केला हल्ला

Next

करमाळा : सोमवारी भिवरवाडी येथे गायीवर झालेला हल्ला हा बिबट्यानं नव्हे तर तरस या वन्य प्रण्याने केला आहे. घटनास्थळी मिळालेले केसाचे नमुने व पायांच्या ठशावरून सिध्द हे होते, अशी माहिती सोलापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी प्रसिध्दपत्रकान्वये मंगळवारी दिली.
करमाळा तालुक्यात  ३ मार्चपासून आतापर्यंत सोलापूर वन विभागाने बिबट्या या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत थर्मल ड्रोन, डॉग स्कॉड सर्चिंग, डेली पगमार्क डेटा ऑनालेसिस व ऑन स्पॉट कॉल व्हेरिफिकेशन आणि १४ गस्ती पथकांच्या माध्यमातून बिबट्याचे सर्च ऑपरेशन सुरू ठेवले आहे. 

लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व वन कर्मचारी अहोरात्र घरोघरी जाऊन लोकांमध्ये बिबट्या या वन्य प्राण्यांविषयी जनजागृती सुरू केले असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील एक आठवडा नरभक्षक बिबट्याविषयी लोकांमध्ये पसरलेले गैरसमज व अफवांचे निराकरण करण्याचे प्रयत्न वन विभाग करत आहे. बऱ्याच ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे म्हणून तरस, कुत्रे व इतर वन्य प्राण्यांचे ठसे अथवा चित्रफिती या प्रसार मध्यमांमध्ये येत आहेत. लोकांनी इंटरनेटच्या माध्यमातून बिबट्याचे ठसे व त्याची माहिती घेत जुन्या व खोट्या चित्रफिती यांची शहानिशा करावी व नंतरच विश्वास ठेवावा. सोमवारी  भिवरवाडी येथील गायीवर झालेला हल्ला हा तरस या वन्य प्राण्याने केला असून, ते तेथे मिळालेल्या केसाच्या सॅम्पल व पायांच्या ठशांवरून सिद्ध होते. लोकांनी अफवांवर विश्वासू ठेवू नये. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी; अन्यथा ते कारवाईस पात्र ठरतात, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

Web Title: Forest Department outspokenness; Says .. The attack on the cow and calf was not by leopard but by fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.