लष्करमधील लोधी अन् कुंभारगल्ली सील; सोलापुरात पुन्हा आढळले सहा पॉझिटिव्ह...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 06:54 PM2020-04-23T18:54:56+5:302020-04-23T19:37:12+5:30
संख्या झाली ३९: सोलापुरात 'कोरोना'चा संसर्ग वाढल्याने आता पर्यंत ९ हॉटस्पॉट...
सोलापूर : सोलापुरातील कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या झाली 39 आज सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामध्ये चार पुरुष व दोन महिलांचा समावेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती दिली.
नव्याने आढळलेले रुग्ण सदर बझारमधील लोधी व कुंभार गल्लीतील आहेत. लोधीगल्लीत राहणाºया ९0 वर्षाच्या वृद्धाला तर शास्त्रीनगरात राहणाºया ६४ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचप्रमाणे कुंभारगल्लीत राहणाºया ७0 वर्षीय वृद्धेचाही अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला आहे. चौथा रुग्ण भारतरत्न इंदिरानगरातील मरण पावलेल्या वृद्धेचा नातेवाईक आहे. अशाप्रकारे सोलापुरात आता कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ३७ झाली असून, यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर ३४ जणांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे सोलापुरात ज्येष्ठांमध्ये कोरोणाची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
लोधीगल्ली सील
सोलापुरात कोरोणाचा संसर्ग वाढल्याने आतापर्यंत नऊ हॉटस्पॉट झाले आहेत. आता त्यामध्ये लोधीगल्लीची पडली आहे. सदर बझार पोलीस ठाण्याचा बहुतांश भाग प्रतिबंधीत क्षेत्रात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली.