हंगिरगे येथील गणेश शिवराम चव्हाण या तरुणाला जुनी दुचाकी घ्यायची होती. म्हणून त्याने ओएलएक्सच्या वेबसाईटवर जुन्या दुचाकीची जाहिरात पाहून दत्तू कन्नाव यांना त्यांचा मोबाईल नंबर मागितला. १८ फेब्रुवारी रोजी गणेश चव्हाण याने त्यांना फोन करुन गाडीची माहिती विचारली. त्याने दुचाकीची माहिती टेलिग्रामवर पाठवली. कन्नाव याने मिलिटरीचे कॅन्टीन कार्ड, अकाऊंट नंबर, फोन पे नंबर पाठवून चव्हाण यास आईचे आधारकार्ड पाठविण्यास सांगितले. हा दुचाकीचा व्यवहार २१ हजार रुपयाला ठरला. गणेश चव्हाणने दुचाकीच्या खरेदीपोटी ३ हजार रुपये फोन पे वरून ॲडव्हान्स पाठवला. त्यानंतर त्याने बाबीची पूर्तता करून घेत दुचाकी तुमच्या घरी आल्यानंतर उर्वरित रक्कम द्या असे सांगितले होते.
दरम्यान गणेश चव्हाण यांनी बँक खात्यावर चॅटमध्ये मेसेज पाहिला असता त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी गुन्हा नोंदला आहे.
----