प्रसूतीसाठी येणाºया मातेसह नातेवाईकांना मोफत जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 03:49 PM2018-12-28T15:49:42+5:302018-12-28T15:52:56+5:30

मंगळवेढा : मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती होणाºया महिलांची संख्या जास्त आहे़ प्रसूती होणाºया मातेस शासनाकडून तीन दिवसांचे मोफत ...

Free meals for relatives with a mother coming for delivery | प्रसूतीसाठी येणाºया मातेसह नातेवाईकांना मोफत जेवण

प्रसूतीसाठी येणाºया मातेसह नातेवाईकांना मोफत जेवण

Next
ठळक मुद्देप्रसूती व शस्त्रक्रिया झालेल्या मातांना मोफत ने- आण करण्याची व्यवस्थारुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरच्या पाण्याची व आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय केली रूग्णांना रूग्णालयात प्रवेश केल्यानंतर प्रसन्न वाटावे, यासाठी बगीचा तयार

मंगळवेढा : मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती होणाºया महिलांची संख्या जास्त आहे़ प्रसूती होणाºया मातेस शासनाकडून तीन दिवसांचे मोफत जेवण दिले जाते. येथील रुग्णकल्याण समिती अध्यक्षा शीला शिवशरण व समिती सदस्य यांनी प्रसूती मातेसोबत असणाºया नातेवाईकासही मोफत जेवण देण्याचा ठराव करून दोन व्यक्तीस मोफत जेवण दिले जाते.

प्रसूती व शस्त्रक्रिया झालेल्या मातांना मोफत ने- आण करण्याची व्यवस्था आहे. रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरच्या पाण्याची व आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय केली आहे. रूग्णांना रूग्णालयात प्रवेश केल्यानंतर प्रसन्न वाटावे, यासाठी बगीचा तयार करण्यात आला आहे. मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात मरवडेसह डोणज, कागष्ट, भाळवणी, निंबोणी ही पाच उपकेंद्रे येतात. या उपकेंद्राखाली मरवडे, डोणज, भालेवाडी, फटेवाडी, खोमनाळ, कागष्ट, डिकसळ, बालाजीनगर, बनतांडा, कात्राळ, कर्जाळ, निंबोणी, जित्ती, खवे, येड्राव, भाळवणी, तळसंगी, जालीहाळ, हिवरगाव ही गावे समाविष्ट आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र मरवडे येथे २०१८-१९ या चालू वर्षातील एप्रिल महिन्यात २ हजार ३५९, मेमध्ये २ हजार ७७५, जूनमध्ये २ हजार ६४१, जुलै महिन्यात ३ हजार ३३१, आॅगष्टमध्ये ३ हजार ३१६, सप्टेंबरमध्ये ३ हजार ४९२, आॅक्टोबरमध्ये ३ हजार २०४, नोव्हेंबर महिन्यात २ हजार ३५४ असे एकूण ८ महिन्यात २३ हजार ४७२ रुग्णांनी उपचार घेतले आहेत़ या आरोग्य केंद्रासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे वार्षिक उद्दिष्ट २१६ होते़ डिसेंबरअखेर १८० शस्त्रक्रिया करून ९ महिन्यात १८४ टक्के काम झाले आहे.

खासगी दवाखान्यात किरकोळ उपचारासाठी हजारो रुपये खर्च येत असल्याने केवळ १० रुपयांच्या केसपेपरमध्ये डॉक्टरांच्या                  मेहनतीमुळे हे केंद्र नावारुपास येत आहे़  मरवडेसह झळकी, रेवतगाव, शिरढोण, चडचण (ता़ इंडी, कर्नाटक) हळ्ळी, बालगाव, उमदी, संख, (जि़ सांगली) या सीमावर्ती भागातील नागरिक उपचारासाठी गर्दी करत आहेत. दर मंगळवारी कुटुंब नियोजनशस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले जाते. तालुका आरोग्याधिकारी डॉ.  नंदकुमार शिंदे स्त्रीटाका शस्त्रक्रिया सर्जन म्हणून काम पाहतात. कमीतकमी वेळेत दोनच टाका घेऊन शस्त्रक्रिया करत असल्याने त्यांच्याकडून शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी रुग्णांची गर्दी वाढत आहे. आठवङ्याला १० ते १५ शस्त्रक्रिया होतात. दर शनिवारी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तपासणी केली जाते.

नेत्रचिकित्सा अधिकारी म्हणून खजुरगी यांच्याकडे तात्पुरता पदभार आहे. दर महिन्याला ३०० ते ४०० रुग्णांची तपासणी करून महिन्याला ३५ ते ४० मोतीबिंदू शस्त्रक्रिया होतात. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जामदार, तालुका आरोग्याधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औषधनिर्माण अधिकारी हणमंत कलादगी, आरोग्य सहायक पांडुरंग कोळी, पांडुरंग शिंदे, कनिष्ठ सहायक लाडले, मुलाणी, आरोग्य सहायिका राणी स्वामी, आरोग्य सेविका क्रांती स्नेहल पाटील, रूपाली तिºहेकर, विद्याराणी स्वामी, सुधामती गंगणे, स्वाती रोकडे, हिरेमठ, उमा हुलवान, आरोग्य सेवक रमेश पाटील, चंद्रकांत पवार, आशा गट प्रवर्तक शारदा चिकमने, पूजा येडसे, वाहन चालक मोहनराव सरडे, रंजना काळे सर्व आशा चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

Web Title: Free meals for relatives with a mother coming for delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.