टेंभुर्णीत मोफत नेत्रपटल तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:27 AM2021-09-17T04:27:09+5:302021-09-17T04:27:09+5:30
मधुमेहामुळे डोळे, हृदय, मेंदू, किडनी आणि नसा हे अवयव खराब होऊ शकतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित साखर तपासणी व ...
मधुमेहामुळे डोळे, हृदय, मेंदू, किडनी आणि नसा हे अवयव खराब होऊ शकतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित साखर तपासणी व वर्षातून एकदा अवयवांची तपासणी आवश्यक आहे. मधुमेहामुळे डोळ्याच्या दृष्टिपटलावर रक्तस्राव होऊन अंधत्व येऊ शकते. निदानासाठी दृष्टिपटलाचा ओसीटी स्कॅन करावा लागतो. यासाठी साधारण २००० ते २५०० रुपये खर्च येतो. अनेक कुटुंबातील व्यक्तींना हा खर्च शक्य नाही. रोटरी क्लब टेंभुर्णी व आनंद नेत्र रुग्णालय यांच्या वतीने साडेतीन महिने मोफत नेत्रपटल तपासले जाणार आहे.
या शिबिरात येणाऱ्या प्रत्येक मधुमेही व्यक्तींचा आशानंद नेत्र रुग्णालय येथे ओसीटी स्कॅन मोफत करण्यात येणार आहे. या तपासणीत काही दोष आढळल्यास पुढील उपचारासाठी मार्गदर्शन आणि आवश्यक असल्यास उपचारही केला जाणार असल्याचे डॉ. खडके यांनी सांगितले.