गणपतआबा राजकारणापलीकडचे प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:26 AM2021-08-19T04:26:50+5:302021-08-19T04:26:50+5:30

शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी बुधवारी रामदास ...

Ganapataba Talented personality beyond politics: Ramdas Athavale | गणपतआबा राजकारणापलीकडचे प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व : रामदास आठवले

गणपतआबा राजकारणापलीकडचे प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व : रामदास आठवले

Next

शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी बुधवारी रामदास आठवले सांगोल्यात आले होते. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रतनबाई देशमुख, चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.

स्व. गणपत आबांनी विधानसभेत शेतकरी, दीनदलितांसाठी व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. सन १९९९ व २००४ साली पंढरपूर लोकसभा निवडणुकीत त्यांनी मला सांगोला तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून दिले होते, याची आठवण यानिमित्ताने त्यांनी करून दिली.

त्यांच्यासमवेत राज्य चिटणीस राजाभाऊ सरवदे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष बापूसाहेब बनसोडे, नगरसेवक सूरज बनसोडे, तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, विक्रम शेळके, अंबर काटे, दिगंबर गवळी, जिल्हा चिटणीस राजा मागाडे, वसंत होवाळ, शहराध्यक्ष सतीश काटे, रामा बनसोडे, आकाश सोनवले, सुरेश पारसे, अरुण बनसोडे, संजय करडे, तेजस आढाव, मातंग आघाडी तालुकाध्यक्ष विवेकानंद क्षीरसागर, विशाल सरतापे, सुरेंद्र ढोबळे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ :::::::::::::::

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी स्व. गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

Web Title: Ganapataba Talented personality beyond politics: Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.