स्वातंत्र्यदिनादिवशी रुग्ण हक्क संघटनेने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले आणि माढा तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या बिलात २० लाख ४२ हजार २१४ रुपयांचा फरक निघत असल्याचे सांगून अनेक रुग्णांची त्यात फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला होता. यावर डॉक्टरांनी सर्व आरोप खोडून काढत शासनाच्या अध्यादेशानुसारच कोविड सेंटरमध्ये रुग्णांची बिले आकारली होती. दरम्यान, शासनाचा नवा अध्यादेश आल्याने हा फरक दिसत आहे, तरी फरक रुग्णाला परत करण्यात येत आहे. शासनाच्या सूचनेनुसारच सर्व डॉक्टर हे कोविड सेंटर चालवत आहेत. जर कोणी त्यातूनही बदनामी करत असेल तर कोविड कार्यातून कार्यमुक्त करावे, अशी मागणी डॉक्टरांनी केली.
या पत्रकार परिषदेला डॉ. विलास मेहता, डॉ. दिनेश कदम, डॉ. जयंत करंदीकर, डॉ. चंद्रशेखर साखरे, डॉ. विनोद शहा, डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. बाहुबली दोशी, डॉ. रोहित बोबडे, डॉ. संतोष सुर्वे, डॉ. विनायक रूपदास, डॉ. रवींद्र देवकते, डॉ. विश्वेश्वर माने आदी उपस्थित होते.