घोटी ग्रामपंचायतीवर धोंडोपंत ग्रामविकास आघाडीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:23 AM2021-01-20T04:23:19+5:302021-01-20T04:23:19+5:30

बेंबळे : घोटी (ता.माढा) ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सत्ता अबाधित ठेवत राजाभाऊ बागल यांच्या धोंडोपंत ग्रामविकास आघाडीने ११ पैकी ८ ...

Ghondi Gram Panchayat is dominated by Dhondopant Gram Vikas Aghadi | घोटी ग्रामपंचायतीवर धोंडोपंत ग्रामविकास आघाडीचे वर्चस्व

घोटी ग्रामपंचायतीवर धोंडोपंत ग्रामविकास आघाडीचे वर्चस्व

Next

बेंबळे : घोटी (ता.माढा) ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सत्ता अबाधित ठेवत राजाभाऊ बागल यांच्या धोंडोपंत ग्रामविकास आघाडीने ११ पैकी ८ जागांवर विजय मिळवला. प्रतिस्पर्धी पोपट चव्हाण यांच्या दादा-मामा ग्रामविकास आघाडीने ३ जागा मिळवत सतीश चव्हाण यांच्या युवा स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा पराभव केला.

धोडंपत युवा ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांनी आमदार बबनराव शिंदे यांना भेटून नेतृत्वावर चर्चा केली. याप्रसंगी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे डिसलरी व्यवस्थापक बागल, माजी संरपच नागनाथ भोसले, अड. अर्जुन यादव, कालिदास कणसे, शिवाजी माळी, जीवराज थिटे, अभिमन्यू काळभोर, बापू वणवे, अर्जुन काळभोर, अमीत बागल, अनिल बागल, कैलास कणसे, सुभाष पवार, कुंडलिक भगत, संजय वणवे, हर्षवर्धन कणसे, पवनकुमार गळगुंडे, सचिन वणवे, विलास बागल, अधिकराव पवार, बापू यादव, सुनिल अलाट, संतोष भगत, तानाजी मदने, आप्पा गोडगे, नितीन अलाट, भजनदास काळभोर, नाना काळभोर, पिंटू माळी, संजय मदने, विजय वणवे, कुलकर्णी काका, ज्योतीराम गळगुंडे, बाबा जाधव उपस्थित होते.

Web Title: Ghondi Gram Panchayat is dominated by Dhondopant Gram Vikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.