दूध दरवाढ द्या, अन्यथा पुणे विभागीय कार्यालयाला टाळे ठोकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:21 AM2021-07-26T04:21:59+5:302021-07-26T04:21:59+5:30

स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी व जिल्हाध्यक्ष राहुल घुले यांच्या नेतृत्वाखाली २३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दूध दरवाढीबाबत निवेदन दिले ...

Give milk price hike, otherwise we will block the Pune divisional office | दूध दरवाढ द्या, अन्यथा पुणे विभागीय कार्यालयाला टाळे ठोकू

दूध दरवाढ द्या, अन्यथा पुणे विभागीय कार्यालयाला टाळे ठोकू

Next

स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी व जिल्हाध्यक्ष राहुल घुले यांच्या नेतृत्वाखाली २३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दूध दरवाढीबाबत निवेदन दिले होते. दूध दरवाढ न झाल्यास जनावरे घेऊन मोर्चा काढू, असा इशाराही दिला होता. याची दखल घेऊन जिल्हा दुग्धविकास अधिकाऱ्यांनी लेखीपत्र देऊन पुणे प्रादेशिक अधिकारी यांच्याबरोबर मिटिंग लावू व दरवाढीबाबत तोडगा काढू, असे आश्वासन दिले होते.

गुरुवारी पुणे येथील अधिकाऱ्यांसमवेत सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी पुणे विभागाचे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रशांत मोहोळ, जिल्हा संघटक युवराज घुले, तालुका उपाध्यक्ष रवि गोवे, बापूसाहेब कलुबर्मे, अर्जुन मुद‌्गूल, काका दत्तू उपस्थित होते.

फोटो ओळी ::::::::::::::::::

प्रादेशिक दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रशांत मोहोळ यांना निवेदन देताना युवराज घुले, रवि गोवे, बापूसाहेब कलुबर्मे, अर्जुन मुद‌्गूल, काका दत्तू आदी.

220721\4644img-20210722-wa0021-01.jpeg

फोटो ओळी--

पुणे विभागाचे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रशांत मोहोळ यांना दुधदरवाढीबाबत निवेदन देताना जिल्हा संघटक युवराज घुले, तालुका उपाध्यक्ष रवी गोवे, बापूसाहेब कलूबमे ,अर्जुन मुद्गुल, काका दत्तू आदी

Web Title: Give milk price hike, otherwise we will block the Pune divisional office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.