स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी व जिल्हाध्यक्ष राहुल घुले यांच्या नेतृत्वाखाली २३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दूध दरवाढीबाबत निवेदन दिले होते. दूध दरवाढ न झाल्यास जनावरे घेऊन मोर्चा काढू, असा इशाराही दिला होता. याची दखल घेऊन जिल्हा दुग्धविकास अधिकाऱ्यांनी लेखीपत्र देऊन पुणे प्रादेशिक अधिकारी यांच्याबरोबर मिटिंग लावू व दरवाढीबाबत तोडगा काढू, असे आश्वासन दिले होते.
गुरुवारी पुणे येथील अधिकाऱ्यांसमवेत सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी पुणे विभागाचे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रशांत मोहोळ, जिल्हा संघटक युवराज घुले, तालुका उपाध्यक्ष रवि गोवे, बापूसाहेब कलुबर्मे, अर्जुन मुद्गूल, काका दत्तू उपस्थित होते.
फोटो ओळी ::::::::::::::::::
प्रादेशिक दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रशांत मोहोळ यांना निवेदन देताना युवराज घुले, रवि गोवे, बापूसाहेब कलुबर्मे, अर्जुन मुद्गूल, काका दत्तू आदी.
220721\4644img-20210722-wa0021-01.jpeg
फोटो ओळी--
पुणे विभागाचे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रशांत मोहोळ यांना दुधदरवाढीबाबत निवेदन देताना जिल्हा संघटक युवराज घुले, तालुका उपाध्यक्ष रवी गोवे, बापूसाहेब कलूबमे ,अर्जुन मुद्गुल, काका दत्तू आदी