अमर गायकवाड
सोलापूर : राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाला विरोध दर्शवत ओबीसीतूनच आरक्षण द्या. सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला असून या घटनेचा निषेध नोंदवत दारफळ- वैराग रस्ता रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
दरम्यान, संतप्त मराठा बांधवांनी रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केले सकाळी सुमारे तासभर आंदोलन सुरू असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सीना दारफळ येथील ग्रामस्थांनी हे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी तरुणांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. एकीकडे मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे मराठा समाज बांधव आक्रमक होत आंदोलन करीत आहेत. जोपर्यंत सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी समाज भक्कमपणे उभा असल्याचे यावेळी समाज बांधवांनी सांगितले.