ठळक मुद्दे- लॉकडाऊन काळात सरकारचा चांगला दिलासा- गरीब, मजूर, सर्वसामान्यांना मिळाले धान्य- ग्रामीण भागातील जनतेने मानले सरकारचे आभार
सोलापूर : रेशन कार्ड नसलेल्यांनाही जूनअखेर तांदूळ व हरभरा मोफत देण्याची जिल्हा पुरवठा विभागातर्फे तयारी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली.
कोरोना काळात घरी बसलेल्या दारिद्रय रेषेखालील अंत्योदय व केशरी रेशनकार्ड असलेल्यांना धान्य वितरित करण्यात आले, पण जिल्ह्यात कार्ड नसलेले अनेक जण वंचित राहिल यांच्या तक्रारी आल्यानंतर शासनाने अशा लोकांसाठी ही धान्य साठा जूनअखेर शहर व जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये धान्य उपलब्ध केले जाणार आहे.
या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेण्यात येणार आहे़ त्यामुळे रेशनकार्ड नसलेल्या लोकांना आता मोफत पाच किलो तांदूळ व हरभरा देण्यात येणार आहे.